पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE) यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी मित्र पुरस्कार २०१९-२० साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. “सृष्टी मित्र पुरस्कार” हा राज्यस्तरीय पर्यावरण पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सृष्टी मित्र पुरस्कारांची सुरुवात ही महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी म्हणजेच २०१० मध्ये करण्यात आली. सृष्टी मित्र पुरस्कारांची ही पाचवी आवृत्ती आहे. पर्यावरणपूरक तसेच पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रम व जाणीव जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे या उद्देशाप्रती शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सृष्टी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, लेखक, कवी, छायाचित्रकार, व्यंगचित्रकर, तज्ज्ञ, शिक्षक, महिला आणि इतर नागरिकांना पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रमातील आपले कौशल्य, सर्जनशीलता आणि नवीन कल्पना मांडता याव्यात म्हणून सृष्टी मित्र पुरस्कारांचे आयोजन आहे. स्थानिक पर्यावरणीय समस्यांना ओळखून राबविलेल्या प्रयत्नांचा तपशील विद्यार्थी आणि नागरिक प्रवेशिका स्वरुपात सादर करू शकतात. पर्यावरणीय समस्यांना शाश्वत विकासाची जोड देऊन हाताळणे हे पर्यावरण संवर्धनासाठी केलेले प्रयत्न उपयोगी आणि महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी राबविलेले उपक्रम आणि प्रयत्न, शिक्षक किंवा तज्ज्ञांनी पर्यावरण शिक्षणातील वापरलेल्या अध्यापन पद्धती, लेखक आणि कवींचे पर्यावरण विषयक आणि पर्यावरण संवर्धनपर स्वनिर्मित साहित्य तसेच महिलांनी स्वतः किंवा समूहाने हाती घेतलेले पर्यावरणपूरक प्रयत्न हे सृष्टी मित्र पुरस्कारांच्या माध्यमातून प्रवेशिका स्वरुपात सादर करावे, असे आवाहन पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण शिक्षण केंद्र सर्व विद्यार्थी, शाळा आणि नागरिकांना करीत आहे. सृष्टी मित्र पुरस्कार २०१९-२० साठी विद्यार्थी व नागरिकांकडून वेगवेगळ्या श्रेणींमधून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
वर्षी बालसाहित्य, स्लाईड-शो, छायाचित्र आणि घोषवाक्य या श्रेणींसाठी “पर्यावरण प्रदूषण जसे की, वायू, जल, माती, प्लॅस्टिक, समुद्री आणि ध्वनी” हा विषय आहे.
प्रवेशिका पाठविण्यासाठी अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ ही आहे.
पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती ही महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालयामध्ये माहितीपत्रकांद्वारे पाठविण्यात येत आहे. तसेच पुरस्कारांचा प्रचार-प्रसार हा वेगेवगळ्या प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात येणार आहे. विद्यार्थी, शाळा आणि नागरिकांकडून मागील चार वर्षांतल्या सृष्टी मित्र पुरस्कारांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. सृष्टी मित्र पुरस्कारांद्वारे विद्यार्थी आणि नागरिक स्वतःच्या पर्यावरण संवर्धनात्मक वेगवेगळ्या कल्पना, विचार, कृती उपक्रम आणि उपाययोजना मांडू शकतात. म्हणूनच पाचव्या सृष्टी मित्र पुरस्कारांसाठी नागरिकांकडून भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.
प्रवेशिका पाठविण्यासाठी पत्ता “सृष्टी मित्र पुरस्कार २०१९-२०, पर्यावरण शिक्षण केंद्र, १ पाईनवूड अपार्टमेंट, २३३/१/२, विधाते कॉलनी, औंध, पुणे ४११०६७” आणि ईमेल “srushtimitra@gmail.com”.
दूरध्वनी: ०२०-२७२९८८६२
अधिक माहितीसाठी – वेबसाईट: smawards.in, फेसबुक: www.facebook.com/smawards,
Twitter: @SrushtiMitra, Email: srushtimitra@gmail.com
संपर्क: सारिका थोरवे, मंगेश निकम
पर्यावरण शिक्षण केंद्र
दूरध्वनी: ०२०-२७२९८८६२
ईमेल: sarika.thorave@ceeindia.org
वेबसाईट: smawards.in
फेसबुक: www.facebook.com/smawards
ट्विटर: @SrushtiMitra, twitter.com/SrushtiMitra





