सहा मागण्यासाठी विधानसभा निवडणुकीत राज्यात रान उठवणार : प्रफुल्ल कदम

Oct 10, 2019

कोणत्याही पक्षाच्या 100 ते 150 निवडक सक्षम उमेदवारांचा करणार प्रचार

गेल्या अनेक वर्षापासून चळवळीतून राज्याच्या व देशाच्या हितासाठी पुढे आणलेल्या अभ्यासपूर्ण, कायदेशीर आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सहा मागण्या सर्व पक्षांनी त्यांच्या जाहीरनामामध्ये समाविष्ट कराव्यात आणि या मागण्यांना जाहीर पाठिंबा द्यावा यासाठी किसान आर्मी चे संस्थापक नेते व टाटा-कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी आग्रह धरला असून जनतेने या मागण्या मान्य करणाऱ्या पक्षाला व उमेदवारांना मतदान करावे यासाठी विधानसभा निवडणुकीत रान उठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. टाटा कोयना धरणातील समुद्राकडे वाहून जाणारे तब्बल 116 टीएमसी स्वच्छ व शुद्ध दुष्काळी भागाचे हक्काचे पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात दुष्काळी भागाला देण्यात यावे, आमदार खासदार निधी प्रमाणे ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या प्रत्येक वार्डासाठी दरवर्षी अनुक्रमे 10 लाख रुपये,25 पंचवीस लाख रु., 50 लाख रुपये स्वतंत्र विकास निधी देण्यात यावा आणि सदर निधी खर्च करण्याचे अधिकार त्या-त्या वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांनच देण्यात यावा चारा छावणी व वाळू घोटाळ्यातील तसेच इतर बेकायदेशीर कारभारातील भ्रष्ट व दोषी अधिकाऱ्यावर सबळ व भक्कम पुरावांच्या आधारे तत्काळ कारवाई करावी, राज्यातील सर्व 105 उपसा सिंचन प्रकल्पाची उर्वरित 19 टक्के वीज बिल माफ करावे आणि महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावात एक स्वतंत्र कृषी कार्यालय सुरू करावे,राज्यात वेड्या बाभळी पासून वीजनिर्मितीचे किमान 100 उभा करावे, या सहा मागण्यासाठी प्रफुल्ल कदम आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिनांक 17 एप्रिल रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने लाखो लोकांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी टाटा व कोयना धरणाची पाणी दुष्काळी भागाला देण्याचे आश्वासन दिलेले आहे. पण नंतर शासन आणि विरोधक दोघेही गप्प आहेत.यामागे टाटा यांची भीती, मुंबई व रायगड जिल्ह्यातील गुंतवणूक करणाऱ्या मूठभर धनदांडग्यांच्या काहीतरी कारण सांगून हे पाणी पळवण्याचा डाव आणि पाण्यासाठी निधीच लागत नसल्याने( शासनाला यामध्ये रसच नाही)अशी कारणे असण्याची शक्यता प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केली. भ्रष्ट व दोषी आयएएस व राजपत्रित अधिकारी यांच्या बाबत तर आताच्या खात्याच्या मंत्री हे जेव्हा विरोधी पक्षाच्या आमदार होते त्यावेळी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी केली होती आणि आता तेच मंत्री कारवाई करत नाहीत. लोकांच्या जनहिताच्या मागण्यासाठी आम्ही सतत जवळ केली पाठपुरावा केला परंतु शासनातील आणि शासनाला बाहेरील विरोधक मंडळी या विषयाचे गांभीर्य घेत नाहीत असा आरोपी प्रफुल्ल कदम यांनी केला आहे. आज कोणीही उमेदवार कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवत आहे निवडणुकीत जात, पैसा, पक्ष यालाच प्राधान्य दिले जात आहे यामुळे जनतेच्या हिताचे व राज्याच्या विकासाचे मुद्दे आज बाजूला पडले आहेत यासाठीच आम्ही राज्याच्या हिताचे सहा मुद्दे घेऊन राज्यभर सभा बैठका आणि जिल्ह्याजिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन जनतेला आवाहन करणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. गरज पडल्यास या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यक्षम, अभ्यासू शंभर-दीडशे निवडणूक उमेदवारांचा उघड प्रचार करणार असल्याचेही प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

काय आहे मागण्या ?

मागणी  1 :  टाटा व कोयना धरणातील समुद्राकडे वाहून जाणारे तब्बल 116 टीएमसी स्वच्छ व शुद्ध दुष्काळी भागाचे हक्काचे पाणी प.महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला देण्यात यावे.
मागणी  2 : आमदार-खासदार निधीप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या प्रत्येक वार्डसाठी दरवर्षी अनुक्रमे 10 लाख रु,25 लाख रु आणि 50 लाख रु स्वतंत्र विकास निधी देण्यात यावा आणि सदर निधी त्या-त्या वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांनाच देण्यात यावा.
मागणी 3  :  चारा छावणी घोटाळा,वाळू घोटाळा तसेच इतर भ्रष्ट व बेकायदेशीर कारभारात भ्रष्ट व दोषी IAS व राजपत्रित अधिकाऱ्यांविरोधात प्रफुल्ल कदम यांनी शासनाला सबळ व भक्कम पुरावे सादर करूनही आणि भ्रष्टाचार व बेकायदेशीर कारभार सिध्द होऊनही अद्याप त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही ती तात्काळ व्हावी.
मागणी 4 : राज्यातील सर्व 105 उपसा सिंचन प्रकल्पाचे उर्वरित 19 टक्के वीजबिलही माफ करावे.
मागणी 5 :  महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावात एक स्वतंत्र कृषी कार्यालय सुरू करावे.
मागणी 6  :  वेड्याबाभळीपासून वीजनिर्मितीचे किमान 100 प्रकल्प महाराष्ट्र राज्यात उभारण्यात यावेत.

 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News