नवजात शिशू उपचारा मध्ये नर्सेस ची भूमिका महत्वाची

Oct 11, 2019

बालरोग तज्ज्ञ परिषदेतील कार्यशाळेतील सुर

नाशिक – भारतातील बालमृत्यूचे प्रमाण हे जागतिक प्रमाणापेक्षा बरेच अधिक असून त्या बालमृत्युमध्ये नवजात शिशूंचे प्रमाण अधिक आहे. या नवजातांच्या उपचामध्ये डॉक्टरांसोबतच नर्सेसचीहि भूमिका महत्वाची असते असे प्रतिपादन नवजात शिशुतज्ञ प्रा. सिमन इराणी यांनी व्यक्त केले. त्या नाशिक मध्ये आयोजित “सुरक्षित भावी पिढी” या मध्यवर्ती संकल्पनेवर आयोजित बालरोग तज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान आयोजित नर्सिंग या विषयावरील कार्यशाळेत बोलत होत्या. नाशिक मधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे इंडियन अकेडमी ऑफ पेडिया ट्रिक्स तर्फे या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यास नॅशनल निओनॅनोटोलॉजी फोरम चे सहकार्य लाभले आहे . नर्सिंगच्या कार्यशाळेमध्ये खाजगी व शासकीय रुग्णालयातील नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

   प्रा.इराणी पुढे म्हणाल्या अनेकदा नवजातांवरील  उपचारादरम्यान नर्सेसच्या अचूक निरीक्षणामुळे बाळांमधील बदल त्या त्वरित डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देऊ शकतात,ज्याने बाळा वरील उपचारात मोलाची मदत होते . अशा या कार्यशाळेमधून त्यांना आधुनिक उपकरणे व  तंत्रज्ञान याबाबतची माहिती देखील प्रात्यक्षिकं सोबत दिली जाते.   वैद्यकीय संघटना व शासकीय यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या नियमित प्रशिक्षणाने नवजातांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परिषदेच्या पहिल्या दिवशी नवजातांच्या श्वासोच्छवासाचे आधुनिक प्राथमिक उपचार, नवजात शिशुमधील सर्वसामान्य आजार, जंतूसंसर्ग या विषयांवर देखील कार्यशाळा घेण्यात आल्या.   वैद्यकीय उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व कुशल तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या संगमाने रुग्णास जीवनदान मिळते. या सर्व कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी देशातील नामवंत तज्ञ नाशिक मध्ये आले आहेत.    सदर परिषद यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. संजय आहेर व परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ.पुरुषोत्तम देवी व डॉ मिलिंद भराडिया तसेच डॉ संगीता लोढा, डॉ सागर सोनावणे, डॉ प्रवीण काळे, डॉ संदिप पाटील, डॉ शाम चौधरी, डॉ रमाकांत पाटील, डॉ सुशील पारेख, डॉ कविश मेहता व डॉ अमित पाटील प्रयत्नशील आहेत

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News