किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ संपन्न

Feb 1, 2026

नाशिक: नाशिक शहरातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक ,प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), नाशिक, शासकीय जिल्हा रुग्णालय , सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक, नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग ,नाशिक पोलीस (शहर वाहतूक शाखा) ,राज्य महामार्ग पोलीस विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात पोलीस दलातील अधिकारी , नाशिक जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक व मालक, यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरवात दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी श्री महेश देशमुख प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक प्रास्तविक करतांना म्हणाले, रस्ते नियमांचे पालन हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचे आयुष्य वाचवण्यासाठी असल्याचे अधोरेखित केले. आरटीओ विभागाच्या वतीने वाहन चालवताना घ्यावयाची काळजी आणि तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन डॉ. राज नगरकर (मॅनेजिंग डायरेक्टर, किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक) , राजश्री गुंड (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक), अद्वितीया शिंदे (एसीपी, नाशिक पोलीस – शहर वाहतूक शाखा), डॉ. चारुदत्त जगताप (महानगरपालिका आरोग्य विभाग, नाशिक),आणि डॉ. प्रज्ञा अहिरे (जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक) आणि डॉ नितीन कोचर डायरेक्टर किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन तसेच अपघातानंतर तात्काळ दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवेचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. शुभांगी कांबळे (आपत्कालीन विभाग प्रमुख), डॉ. ईशान नेरकर (मेंदू व मणके विकार व शस्त्रक्रिया तज्ज्ञ), डॉ. सचिन पाटील (मणके विकार व शस्त्रक्रिया तज्ज्ञ) आणि डॉ. स्पंदन कोशिरे (रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ) यांनी उपस्थितांना तांत्रिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तज्ज्ञांनी रस्ते सुरक्षा, अपघातांची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत, नाशिकमधील ‘ब्लॅक स्पॉट्स’ (अपघात प्रवण क्षेत्र) कमी करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नमिता सानप यांनी दिली.

CPR आणि BLS प्रशिक्षण ठरले विशेष आकर्षण दुपारच्या सत्रात किम्स मानवता हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी CPR (Cardiopulmonary Resuscitation) आणि BLS (Basic Life Support) चे थेट प्रात्यक्षिक दाखवले. रस्त्यावरील अपघातानंतर रुग्णवाहिका येईपर्यंतच्या ‘गोल्डन अवर’मध्ये एखाद्या जखमी व्यक्तीचे प्राण कसे वाचवता येतील, याचे प्रशिक्षण डॉ. शुभांगी कांबळे व डॉ. लीना भंगाळे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. या प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिकही जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा संदेश देण्यात आला.

दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराच्या शेवटी सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. किम्स मानवता हॉस्पिटलच्या वतीने सर्व उपस्थितांचे आणि सहभागी शासकीय विभागांचे आभार मानण्यात आले. “अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सतर्कता वाढून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News