जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

Sep 8, 2026

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातर्फे विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलमधील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक कार्डियाक टीम उपस्थित होती.

या प्रसंगी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर, डॉ. सीमा नक्साने, डॉ. निर्मल कोलते, डॉ. कांचन भांबारे, डॉ. महेश शिवाजी आहिरे, क्लिनिकल कार्डिओलॉजिस्ट डॉ. हेमंतराज आहिरे, कार्डियाक सर्जन डॉ. प्रणव माळी, डॉ. अझर सय्यद (CVTS) तसेच इमर्जन्सी फिजिशियन डॉ. अखिलेश सोमाणी उपस्थित होते.

हृदयविकार हा केवळ ज्येष्ठांचा आजार राहिलेला नसून, बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत आहे. त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट न पाहता नियमित तपासणी करणे आणि जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डॉ. सुधीर शेतकर यांनी हृदयविकाराचे वेळेवर निदान आणि योग्य उपचारांचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. सीमा नक्साने यांनी तरुण आणि महिलांमध्ये हृदयविकाराबाबत जागरूकता वाढविण्याची गरज व्यक्त करत लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले. डॉ. निर्मल कोलते यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. कांचन भांबारे यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीवर भर दिला. डॉ. महेश शिवाजी आहिरे यांनी हृदयविकाराची लक्षणे जाणवल्यास उपचारात विलंब न करण्याचा सल्ला दिला. डॉ. प्रणव माळी यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे जटिल हृदय शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितपणे करता येत असल्याचे सांगितले, तर डॉ. अझर सय्यद यांनी कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर आणि इमर्जन्सी विभागांमधील उत्तम समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत गोल्डन अवरमध्ये मिळणारी तातडीची वैद्यकीय सेवा अत्यंत महत्त्वाची ठरते. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर, अॅनेस्थेशिया यांसह विविध विभागांची मोठी आणि अनुभवी टीम उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करता येतात. विविध तज्ज्ञ एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने उत्तम समन्वयातून सर्व प्रकारच्या क्रिटिकल कार्डियाक केसेस हाताळण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे

जागतिक हृदय दिनानिमित्त ₹१,००० मध्ये ‘Essential Heart Check-up Package’ उपलब्ध असून, त्यामध्ये ECG, 2D Echo, TMT, Lipid Profile, Creatinine, आणि Cardiologist Consultation यांचा समावेश आहे. नागरिकांनी या विशेष पॅकेजचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

३० सप्टेंबरपर्यंत रक्तदाब, रक्तातील साखर आणि ECG तपासणी मोफत करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा धोका वेळेत ओळखण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.

यावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड श्री. अनुप त्रिपाठी म्हणाले, “उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी कार्डियाक टीम, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध तज्ज्ञ विभागांमधील उत्तम समन्वय ही आमची ताकद आहे. गोल्डन अवरमध्ये तातडीचे उपचार आणि सर्व प्रकारच्या क्रिटिकल कार्डियाक केसेस हाताळण्यासाठी आमची टीम सज्ज आहे. नागरिकांनी ₹१,००० मधील हार्ट चेक-अप पॅकेज तसेच ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणीचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
Breaking News