नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले ‘फॅट टू फिट ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिक’ या विशेष आरोग्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या क्लिनिकचा शुभारंभ फ्रवशी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या अध्यक्षा सौ. शर्वरी लथ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी किम्स मानवता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नागरकर, डायरेक्टर डॉ. प्रार्थना नागरकर यांच्यासह डॉ. मानसी गुजराथी, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. तुषार संकलेचा, डॉ. अमित केले, डॉ. रोहन देव, सौ. वेदिता परांजपे आणि सौ. नित्या पुराणिक उपस्थित होते.
‘फॅट टू फिट’ क्लिनिकचा उद्देश केवळ वजन कमी करण्यापुरता मर्यादित नसून, लठ्ठपणा, मेटाबॉलिक आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित समस्यांचे सर्वंकष व्यवस्थापन करण्यावर भर देणे हा आहे. वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार योग्य वैद्यकीय तपासणी, आहारविषयक मार्गदर्शन, जीवनशैलीतील आवश्यक बदल, शारीरिक सक्रियता आणि नियमित आरोग्य निरीक्षण यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.
लठ्ठपणा हा केवळ वजनाशी संबंधित विषय नसून त्याचा परिणाम व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर आरोग्य तपासणी, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांना महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर ‘फॅट टू फिट’ क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना शास्त्रीय, संरचित आणि दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. राज नागरकर यांनी लठ्ठपणाकडे केवळ वजनाचा प्रश्न म्हणून न पाहता त्याचा एकूण आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सौ. शर्वरी लथ यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती वाढविण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः तरुण पिढी, विद्यार्थी आणि कुटुंबांमध्ये आरोग्यदायी सवयी निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
किम्स मानवता हॉस्पिटलच्या वतीने ‘फॅट टू फिट ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिक’च्या माध्यमातून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्यास हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद
नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...






