किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

Jan 2, 2026

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रगती म्हणून Normothermic Manual Perfusion for Kidney Transplant या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी हॉस्पिटल मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेत डॉ. मोहन पटेल, किडनी विकार तज्ञ व किडनी प्रत्यारोपण विभागप्रमुख यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन या तंत्रामुळे प्रत्यारोपणापूर्वी किडनीला शरीरासारख्या नैसर्गिक तापमानात रक्तपुरवठा करता येतो. यामुळे अवयवाची कार्यक्षमता टिकून राहते, प्रत्यारोपणानंतरच्या गुंतागुंती कमी होतात आणि रुग्णांची रिकव्हरी अधिक जलद होते. महाराष्ट्रात प्रथमच हे अत्याधुनिक तंत्र वापरून यशस्वीरित्या किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.

यावेळी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नागरकर म्हणाले, किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सर्वोत्तम व अत्याधुनिक उपचार देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन सारखी प्रगत तंत्रे उपलब्ध करून देत आम्ही किडनी प्रत्यारोपणाच्या उपचारांमध्ये नवे मानदंड प्रस्थापित करत आहोत. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

डॉ. मोहन पटेल पुढे म्हणाले की, “या तंत्रामुळे किडनी प्रत्यारोपणाच्या यशाचे प्रमाण वाढते तसेच दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले दिसून येतात. ही सुविधा नाशिकसाठी एक महत्त्वाची वैद्यकीय उपलब्धी आहे.” या महत्वपूर्ण प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र पोलीस यांच्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सीओओ डॉ. निलेश सिंग यांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले,किम्स मानवता हॉस्पिटल येथे अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णकेंद्रित सेवा यासाठी ओळखले जाते. नेफ्रोलॉजी व किडनी ट्रान्सप्लांट विभागात हॉस्पिटलने आतापर्यंत अनेक यशस्वी उपचार करून रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.

या पत्रकार परिषदेला शहरातील प्रमुख प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News