मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Oct 12, 2019

नाशिक दि.12- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी माझ्या भविष्यासाठी मतदान करा! या उपक्रमाच्या माध्यमातुन मुलांनी आपल्या पालकांना पत्राच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकरी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सर्व निवडणूक निरीक्षक व खर्च निरीक्षक यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक अजयकुमार चौधरी, रोहित शर्मा, बी. एच. तलाटी, व्यंकटेशपथी एस, करुमांची संध्याराणी, रणजितकुमार जे., बी. रामा राव, एम. रामा राव, प्रसन्नकुमार जेना, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., पोलीस अधिक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निवडणुक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे उपस्थित होते.
श्री. मांढरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘वोटकर नाशिककर’या मोहिमेच्या माध्यमातून 52 वर्षातील सर्वाधिक मतदानाचा विक्रम नोंदविला आहे. विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
मतदारसंघनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली असून उपजिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी अहवाल मागविला जात आहे. 67 स्थायी निगराणी पथकाचे सदस्य 24 तास कार्यरत असून पथकाच्या प्रमुखाला कार्यवाही करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे नियोजन करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. भरारी पथकांच्यामार्फत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर योग्यती कार्यवाही करण्यात येत असून पोलिस विभागाकडून निवडणूक कालावधीत शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
सदर बैठकीसाठी सर्व निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News