नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दिवशी सर्व दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात दिव्यांग मतदार यांना सुविधा पुरविण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, रोहयो उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले, भगवान वीर, रवी मोरे, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, एस.सी.बागडे, समाजकल्याण सहायक आयुक्त राकेश महाजन, डॉ. मंगेश वानखेडे, समाजकल्याण अधिकारी बी आर धिवरे, ए ए कुलकर्णी, बी एम चौधरी आदी उपस्थित होते.
श्री माने म्हणाले, दिव्यांग मतदारांनी अधिक प्रमाणात मतदान करण्यासाठी त्यांना मतदान केंद्रावर व्हीलचेयर्स, व्हील चेयर्स रॅम्प, ब्रेल लिपी यासोबतच मतदान केंद्रांपर्यंत त्यांची ने-आण करण्यासाठी आवश्यक ती वाहतूक व्यवस्था करण्यात यावी. ज्यामुळे अधिकाधिक दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ होईल, असेही निर्देश त्यांनी दिले.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






