नाशिक ते मुंबई मतदान जनजागृति सायकल रॅली

Oct 16, 2019

नाशिक :- नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असतात, येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा दर, एक सक्षम राष्ट्र होण्यासाठी वाढणे ही काळाची गरज ओळखून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयच्या वतीने,नाशिक जिल्हाधिकारी मा.सुरज मांढरे सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली, सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने *नाशिक ते मुंबई मतदान जनजागृती रॅलीला आज गोल्फ क्लब मैदान येथून सकाळी 6 वाजता सुरुवात झाली. मा.जिल्हाधिकारी श्री.सुरज मांढरे सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली,यावेळी नाशिक जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक सर,नाशिक सायक़लिस्ट अध्यक्ष श्री. रत्नाकर आहेर ,लायन्स क्लब ऑफ कोर्पोरेट ,नाशिकचे अध्यक्ष राजू व्यास सर, व पदाधिकारी उपस्थीत होते.तसेच सायकलिस्ट राजेन्द्र वानखेडे, सौ.नलिनी कड व इतर सायकलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
सुरज मांढरे सर व रविंद्र नाईक सर हे स्वत: गोल्फ क्लब ते पाथर्डी फाटा पर्यंत सायकलवर या मतदान जनजागृति अभियान रॅलीत सहभागी झाले व *वोट कर नाशिककर* हा संदेश दिला व सायकलिस्टला पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
या रॅलीत चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, डॉ.मनीषा रौंदळ,रमेश पवार, काशिनाथ देसाई, विनायक वारुंगसे, भक्ती दुसाने, दविंदर भेला, सुरेश डोंगरे ,साधना दुसाने ,श्रीराम पवार हे सायकलिस्ट सहभागी झाले .विशेष म्हणजे विनायक वारुंगसे हे साध्या बेसिक सायकलवर प्रवास करत आहे. सायकलिस्ट मार्गात ठीक ठिकाणी मतदान करण्या बाबत प्रबोधन करत गेले. वील्होळी,वाडीव-हे , गोंदे दुमाला, मुंडेगाव ,घोटी, इगतपुरी, कसारा या गावात नागरिकांशी संवाद साधत मतदानाबद्दल, गावागावात प्रबोधन केले.आज सायंकाळी ही रॅली, गेट वे ऑफ इंडिया येथे पोहचेल व मतदाना बद्दल जनजागृति करातील.

 

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News