एच एल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे पावसाळी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Sep 15, 2023

ओझर टाऊनशिप (वार्ताहर) : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. एल. हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या 17 वर्षाखालील मुला मुलींच्या गटाने लासलगाव येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत 100 मीटर,200मीटर,400 मीटर ,3किलोमीटर आणि 4×100 रिले धावणे, भालाफेक थाळीफेक ,हाथोडाफेक, अडथळ्याची शर्यत इत्यादी स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावले.या मध्ये विशेष करून कु.कशफिन अकिल शेख हिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकाविला तर कुमारी श्रेया सुनील शर्मा हिने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे बुद्धिबळ स्पर्धेत कुमार प्रेमदास बारहे या विद्यार्थ्याने 19 वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला.सर्व विजेते विद्यार्थी विद्यार्थिनीं जिल्हा पातळीवरील स्पर्धेत शाळेच्या वतीने सहभागी होऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवतील . सर्व सहभागी व विजेत्या खेळाडूंचे संस्थेच्या सचिव डॉ.दीप्ती देशपांडे, विभागीय सचिव, डॉ. राम कुलकर्णी ,अधीक्षक के. एन. पाटील, प्राचार्य एस.बी. शिरसाट ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. इ. पगारे ,विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. बोडके एस. पी. ,पर्यवेक्षक जोशी एस .एन. यांनी शुभेच्छा देत विशेष अभिनंदन केले.या स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक संभाजी मुन्तोडे, सुनील एकार, व योगेश शिंदे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News