एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

Aug 12, 2023

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष क्रीडा शिक्षक योगेश मारुती शिंदे यांना नुकताच निफाड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार प्राप्त झाला आहेत.

निफाड तालुक्यातील क्रीडा क्षेत्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकाविल्याबद्दल तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणुन विशेषतः ज्युडो या क्रीडा प्रकारात तालुका व जिल्हास्तरावर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत राज्य स्तर, राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविल्याबद्दल तसेच क्रीडा क्षेत्रात दिलेल्या बहूमोल योगदानाबद्दल योगेश शिंदे सर यांना निफाड येथे दि. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिक्षक योगेश शिंदे यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विलास निरभवणे सचिव माणिक गीते सर सुभाष खाटेकर सर भाऊसाहेब जाधव सर महेश पाटील सर आदि मान्यवर उपस्थित होते.शिंदे यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव व एच. आर डायरेक्टर डॉ.दीप्ती देशपांडे व विभागीय सचिव डॉ राम कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी.शिरसाठ, उपप्राचार्य एस. ई. पगारे , उपमुख्याध्यापक सी एन निकम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
Breaking News