Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024 दरम्यान संपन्न झाल्या. त्या स्पर्धेचे उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांच्या हस्ते झाले . महाराष्ट्र राज्यातील एकूण ३३ जिल्ह्यातील सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये विविध वय व वजन गटातील स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत एच.ए.एल. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये इयत्ता दहावीच्या हार्दिक खोडके याने 50 किलो वजनी गटात तसेच इयत्ता अकरावीची भारती सैनिक हिने 52 किलो वजन गटात चांगली कामगिरी केली व वैष्णवी खलाणे हिने कुमार गट 52 किलो तसेच वरिष्ठ गट 57 किलो कॅडेट गट 52 किलो वजन गटात नाशिकला व महाविद्यालयाला सुवर्णपदक मिळवून दिले. ती या राज्यस्तर जुदो स्पर्धेत एकमेव विद्यार्थी होती की तिने तीन वयोगटात सुवर्णपदक पटकावले त्याचप्रमाणे रोहित चव्हाण यांने देखील एक रौप्य व कास्य पदक 73 किलो वजन कुमार गटात पटकावले .
कार्यक्रमाच्या निरोप समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब उपस्थित होते. या स्पर्धा खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न झाल्या. वैष्णवी व रोहित यांना संस्थेच्या सचिव डॉक्टर दीप्ती देशपांडे तसेच विभागीय सचिव राम कुलकर्णी ,ओझर विभागाचे अधिक्षक के एन पाटील, प्राचार्य आर एम चौधरी तसेच उपप्राचार्य एस ई पगारे उपमुख्यध्यापिका एस पी बोडके मॅडम पर्यवेक्षक जोशी सर, मैंन सर यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक योगेश शिंदे, संभाजी मुंतोडे, सुनील एकार यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले होते तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






