Nashik : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए.एल. सायन्स अँडकॉमर्सची विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा संदीप शिंदे हीची लखनऊ,उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी निवड झाली आहे.सदर स्पर्धा ३१मे ते ३जून दरम्यान पार पडणार आहेत.याआधी जानेवारी महिन्यात लव्हली युनिव्हर्सिटी, पंजाब येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुलेपुणे युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करीत ४८ कीलोखालील वजनी गटात कांस्य पदक पटकावले.या स्पर्धेत भारतभरातून एकूण १८०युनिव्हर्सिटीनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्याने आकांक्षाची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी निवड झाली.
आकांक्षा पुणे विद्यापीठातील नाशिक विभागाची विद्यार्थिनी असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.याआधी तिने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण तसेचविविध पदके पटकावून नाशिकचे आणि आपल्या महाविद्यालयाचे नावलौकिक केले.याबद्दल संस्थेचेसचिव सर डॉ. मो.सो. गोसावी तसेच डॉ.दीप्ती देशपांडे मॅडम एच.आर.ए डायरेक्टरव विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खंडेलवाल सर,उपप्राचार्य सुर्वे सर, विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. शिरसाट तसेच एनएसएसचेपुष्कर पाडेकर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आकांक्षाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. तिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री. योगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे
Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...






