नाशिकच्या सपना गरगटेची पुणे विद्यापीठ व्होलीबॉल संघात निवड. संघ आ आंतर विद्यापीठ स्पर्धासाठी राजस्थानला रवाना. सर्व थरातुन अभिनंदन.

Oct 21, 2019

नाशिक दिनांक २० ऑक्टोबर –  नाशिकरोड बिट्को महाविद्यालयाची व्होलीबॉल खेळाडू सपना गरगटे
हीची पुणे विद्यापीठाच्या संघात नीवड झाली आहे. सपना नाशिकरोड़च्या रेणुका क्रीड़ा असोसिएशन ची खेळाडू असून ती गेल्या दहा वर्षापासून रेणुका क्रीड़ा असोसिएशनच्या मैदानावर मनोज म्हस्के आणि निखिल कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. तसेच तीला नाशिकरोड बिट्को महा विद्या लयाचे क्रीड़ा संचालक प्रा.  दिलिप लोंढे यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळले.   नुकत्याच पुणे येथे आयोजित आंतर विभागीय स्पर्धेत सपनाने नाशिक विभागाचे प्रतिनीधीत्व केले. सपनाने या स्पर्धेत चांगला खेळ करून नाशिक विभागाला तीसरा क्रमांक मिळवुन देण्यात महत्वाची भूमिका पर पाडली.
तिच्या या अष्टपैलु खेळाची दखल घेवुन सपनाची पुणे विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे. या वेळच्या या पुणे विद्यापीठ संघात निवड झालेली ती नाशिक विभागाची एकमेव खेळाडू आहे.
अखील भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा राजस्थान येथे आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेसाठी आज पुणे विद्यापीठ संघ  राजस्थान येथे रवाना झाला.
सपना गरगटेच्या या निवडीबद्दल तीचा रेणुका क्रीड़ा असोसिएशनच्या वतीने क्रीड़ांगणावर  रेणुका असोसि एशनचे संचालक लंकेश गाड़ेकर आणि नाशिक जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा छत्र पती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यांप्रसंगी प्रशिक्षक मनोज म्हस्के,  राजू पठाण,  सहाय्यक प्रशिक्षक निखिल कुरकुरे, सतीश पेखळे,  श्रीमती गरगटे आणि  सर्व सहकारी खेळाडू उपस्थित होते. सपनाने याआधी शालेय आणि असोसिएशनच्या 
विवीध स्पर्धात प्रावीण्य मिळविले असून या विद्यापीठ स्पर्धातही ती चांगली कामगीरी करेल असा विश्वास तीचे प्रशिक्षक मनोज म्हस्के यानी व्यक्त केला.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News