राज्य लॉन टेनिस स्पर्धेसाठी शताक्षी दरेकरची निवड

Oct 26, 2019

नाशिक   –  नाशिक येथील निवेक स्पोर्ट्स क्लब  येथे नाशिक  विभागीय शालेय लॉन टेनिस  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत नाशिकचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या 
 नाशिक केम्ब्रिज विद्यालयाच्या शताक्षी दरेकर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन  द्वितीय क्रमांक पटकावत चांगले यश संपादन केले. या उत्कृष्ट खेळामुळे तीची नाशिक विभागाच्या संघात  निवड झाली आहे.   नोव्हेम्बरच्या तीसऱ्या आठवडात पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद लॉन टेनिस स्पर्धेत  शताक्षी नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करेल. 
शताक्षी  गेल्या ५ वर्षांपासून, इंदिरानगर येथील श्री मोदकेश्वर सेवा ट्रस्टच्या लॉन टेनिस क्लब येथे टेनिसचे मार्गदर्शक जयंत कर्पे, भारत दाभाडे, मयूर खरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 
शताक्षीने या आधीही  फेब्रुवारी महिन्यात झालेल्या   ज्युनीयर गटाच्या  महाराष्ट्र राज्य स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे  या राज्य स्पर्धेतही शताक्षी उत्तम खेळ करून विजय  प्राप्त करेल असा विश्वास तिचे  प्रशीक्षक जयंत करपे, जेेेष्ट खेळाडू शशांक पगार, विजय खरोटे आदीनी  वक्त केला. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News