३० ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा टेनीस व्होलिबॉल स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन

Oct 29, 2019

नाशिक – नाशिक जिल्हा टेनीस व्होलिबॉल असोसिएशनच्या वतीने आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने यशवंत व्यायाम शाळा येथे उद्या दिनांक ३० ऑक्टोबर, २०१९ रोजी दुपारी ०४. ०० वाजता ज्युनीयार आणि सब ज्युनीयर गटाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे . ज्युनीयार गटा सा ठी खेळाडूची जन्मतारीख १ जानेवरी, २००१ किंवा त्यानंतरची तर सब ज्युनीयर गटासाठी खेळाडूची जन्मतारीख १ जानेवारी, २००३
किंवा त्यानंतरची असावी.या स्पर्धातील कामगिरीच्या आधारे या दोन्हीही गटासाठी नाशिक जिल्हा संघाची निवड केली जाणार असून हे संघ पुणे येथे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य स्पर्धात नाशिक जिल्याचे प्रतिनिधीत्व करतील.
तरी या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूनी सहभागी व्हावे असे आवहान जिल्हा टेनीस व्होलीबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहीतीसाठी आनंद खरे मो. क्र. ७०३८०५३२२१ अथवा मनोज म्हस्के मो. क्र. ८००७१२३४१५ यांच्याशी संपर्क करवा.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News