नाशिक :– मागील वर्षी झालेल्या खेलो इंडीया राष्ट्रीय स्पर्धात महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तम कामगिरी केली होती. याची दखल घेवून यावर्षी आसाम येथे आयोजित होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धासाठी महाराष्ट्र संघ पात्र ठरला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाची निवड करण्यासाठी दिनांक तीन नोव्हेम्बर रोजी रहता, जिल्हा अहमदनगर येथे निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणी मध्ये नाशिक जिल्हाचे महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी यूथ गटाच्या केवळ मुलींसाठी
नासिक जिल्हा व्होलीबॉल असोसिएशनच्या वतीने दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी सकाली ०९.०० वाजता जिल्हा व्होलीबॉल निवड चाचणीचे आयोजन मित्र विहार स्पोर्ट्स क्लब, मेहेर सिग्नल, नाशिक येथे करण्यात आले आहे. या निवड चाचणीद्वारे निवड झालेल्या महिला खेळाडू दिनांक तीन नोव्हेम्बर, २०१९ रोजी नेवासा येथे आयोजित निवड चाचणीत नाशिक जिल्हातर्फे सहभागी होतील. या स्पर्धासाठी खेळाडूची जन्म तारीख १जानेवरी , १९९९ किंवा त्या नंतर असावी.
खेळाडूनी जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड, १०वी उत्तीर्ण प्रमाण पत्र /हॉल टिकीट आपल्या सोबत आणने आवश्यक आहे. तरी या चाचणीमध्ये नाशिक जिल्हातील जास्तीत जास्त संस्था, क्लब, कॉलेजच्या उत्कृष्ठ खेळाडूंना सहभागी करावे असे आवहान नाशिक जिल्हा व्होलीबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.अधीक माहीतीसाठी रामदास होते मोबा. क्र. ९९२२३३०७०२ , आनंद खरे मो. क्र. ७०८३०५३२२१ यांच्याशी संपर्क करावे.
सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे
Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...






