आता हया संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना समजणार निवृत्तीवेतनाचा तपशील

Oct 30, 2019

मुंबई : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशील www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना आपला हा तपशील जाणून घेता येईल, अशी माहिती अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपला निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनविषयक तपशील जाणून घेण्यासाठी www.mahakosh.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर NIVRUTIVETANVAHINI या टॅबवर क्लिक करावे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर लॉगिन करण्याकरिता युजरनेम PENSIONER असे टाईप करावे. पासवर्ड ifms123 असा आहे. कॅपचा टाईप केल्यानंतर लॉगिन करावे. लॉगिन झाल्यानंतर स्क्रीनवर वर्क लिस्ट व पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट असे दोन टॅब दिसून येतात. पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून निवृत्तीवेतनधारकाला त्याचे दरमहा किती निवृत्तीवेतन दिले जाते याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

वर्कलिस्ट टॅब वर क्लिक केल्यास क्रियेट पेन्शनर युजर या टॅब वर क्लिक करून निवृत्तीवेतनधारकास स्वत:चे स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने त्यांचा निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक, निवृत्तीवेतन बँक खाते, अचूक नोंदवणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून क्रियेट युजर वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतनधारकाला स्वत:चे लॉगिन (युजर नेम व पासवर्ड) उपलब्ध होईल. या नवीन युजर नेम आणि पासवर्ड ने लॉगिन केल्यानंतर निवृत्तीवेतनधारकास स्वत:च्या निवृत्तीवेतनाची तपशीलवार माहिती उपलब्ध करून घेता येईल, निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे ही अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News