नाशिक, दिनांक ६नोव्हेबर – पुणे येथे दिनांक ३ ते ५ नोव्हेबर, २०१९ दरम्यान कनिष्ठ आणि उप कनिष्ठ गटाच्या २१व्या महाराष्ट्र राज्य टेनीस वॉलीबॉल स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दोनही गटात नाशिकच्या खेळाडूनी चांगले प्रदर्शन केले आणि चवथे स्थान मिळविले. या कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या संघात ज्युनीयर गटात प्रवीण किंगर आणि जयेश चिखले यांची तर सबज्यु नीयर गटात साहिल जोगदंड आणि आयुश नागले या चार खेळाडूची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे. हे खेळाडू नोंव्हेबरच्या तिसऱ्या आठवड्यात बडोदा, गुजरात येथे आयोजित २१व्या राष्ट्रीय टेनीस व्होलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहीती प्रशिक्षक मनोज म्हस्के यानी दिली.
हे सर्व खेळाडू एकलहरा परीसरातील असून ते गेल्या पाच वर्षापासून एकलहरे येथील एन. टी.पी. एस. स्पोर्ट्स क्लबमध्ये मनोज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नियमीत सराव करतात.
खेळाडूच्या या यशाबद्दल टेनिस व्हॉलीबॉल या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, राज्य उपाध्यक्ष अशोक दुधारे, सचिव आनंद खरे, के. के. वाघ संस्थेचे संचालक आदित्य वाघ आदीनी अभिनंदन केले.







