भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष एस वासुदेवन यांचा शिर्डीत सत्कार* भारतीय व्हॉलीबॉल जगात पहिल्या दहामध्ये राहील यासाठी प्रयत्न – भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष एस वासुदेवन

Nov 6, 2019

नाशिक दिनांक ०३  नोव्हेंबर :-  भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष एस वासुदेवन शिरडी येथे साई बाबाचा दर्शनासाठी आले असताना महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने त्यांचे  भव्य स्वागत  आणि सत्कार करण्यात आला. या  प्रसंगी अध्यक्ष  एस.  वासुदेवन यांनी  व्हॉलीबॉल या खेळाविषयी असणारी आसक्ती व लोकप्रियता याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी  सांगितले की व्हॉलीबॉल या खेळाची  जागतिक स्तरावर असणारे  स्थान आणि  जागतिक स्तरावर  या खेळाची असलेली  लोकप्रियता फार मोठ्या प्रमाणात आहे. भारतातही  व्हॉलीबॉल या खेळाची जबरदस्त लोकप्रियता आहे, आणि इतर खेळाच्या तुलनेत हा खेळ  सर्व स्तरावर जास्तीत जास्त प्रमाणात खेळला जातो.  खर्च कमी असल्यामुळे आणि कोणालाही सहज खेळता येणारा हा खेळ आहे. 
भारताचे  आशियायी स्तरावरही चांगले स्थान आहे. त्यामुळे  या खेळाला जागतिक स्तरावर सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या या खेळात भारताचे स्थान पहिल्या दहा संघात असले पाहिजे यासाठी  भारतीय व्हॉलीबॉल महासंघाच्या माध्यमातून चांगले प्रयत्न केले जात आहेत.  खेळाच्या  प्रगतीसाठी  अगदी जिल्हा स्तरापासून ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कश्या प्रकारे विविध उपक्रम राबवले पाहिजे असे सांगितले.  खेळाच्या प्रगतीमध्ये खेळणारे खेळाडू, त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, खेळासाठी सर्व सुविधा पुरविणाऱ्या संस्था. क्रीडा संस्था, प्रशासक आणि क्रीडा प्रेमी या सर्वांचा वाटा असावा लागतो, त्यामुळे या सर्वांची एकत्रीत सांगड घालून व्हॉलीबॉलमध्ये आणखी चांगली प्रगती करता येईल असे  मोलाचे मार्गदर्शक अध्यक्ष वासुदेवन यांनी केले. 
महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या माध्यमातून पार्थ दोशी आणि त्याचे सर्व सहकारी गेल्या दोन वर्षांपासून चांगले काम करत आहेत. खेळाडूसाठी विवीध उपक्रम राबवत असतांनाच  पार्थ दोशी हे  स्वतः संगणक तज्ञ् असल्यामुळे संगणकाद्वारे खेळाडूंची  संपूर्ण माहिती, या खेळासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे आदी बाबी याद्वारे त्वरित उपलब्ध व्हाव्या यासाठीही त्यांचा प्रयत्न आहे. व्हॉलीबॉलमध्ये ही आणखी  चांगली स्टेप आहे असेही  त्यांनी सांगितले. .  
  याप्रसंगी महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष  पार्थ दोषी,  आनंद खरे,  रामदास होते, हिरामण वाकचौरे, मनोज म्हस्के , दादासाहेब तुपे,  सुनील चोळके,आंतरराष्ट्रीय पंच आदिनाथ कोल्हे, गौरव डेंगळे, नितीन बलराज, प्रीतम दुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News