२१व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व. महाराष्ट्राची तीन सुवर्ण आणि तीन रजत पदकांची कामगिरी

Nov 13, 2019

दिनांक ८ ते १० नोव्हेंबरं, २०१९  दरम्यान बरोडा, गुजराथ येथे २१ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उप कनिष्ठ  आणि  कनिष्ठ मुले आणि मुली अश्या चार गटांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या चारही संघानी उत्कृष्ट कामगीरी करून तीन सुवर्ण पदके तर तीन रजत पदकांची कमाई करून या स्पर्धेवर आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. 
सब ज्युनियर गटाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या शाहिद शेख, अज्ञान शेंगडे, फर्दिन मुल्लानी, आयुष नागले, साहिल जोगदंड  आणि रोहन गायकवाड यांनी  चांगला खेळ करून अटीतटीच्या लढतीत यजमान गुजराथचा २- १ असा पराभवकरून विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. तसेच ज्युनियर गटाच्या मुलींच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या राणी मठपती, अंकिता पांडे, पूनम मुळक, कमल मल्ला,  मोनिका  मठपती, आणि अंकिता मोर्तळे यांनी जोमाने खेळ करून यजमान गुजराथवर २-१ ने विजय मिळवून या गटाचे विजेतेपद पाकटावले. तर ज्युनियर गटाच्या मिश्र दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या  निकेश माळवे आणि राणी मठपती यांनी गुजराथविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत प्रथमपासून आघाडी घेत ही लढत २-०ने जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले. सब ज्युनियर मुलीच्या अंतिम लढतीत महात्राष्ट्राच्या गौरी सिंग, स्विटी झा, निधी रावत, रुची तामोरे, निधी थापा आणि स्वरांगी शिंगटे यांनी चांगला खेळ केला. परंतु त्यांना अगदी थोडया फरकाने गुजराथकडून १-२ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे रजत पदकावर समाधान मानावे लागले. तसेच मुलांच्या ज्यूनीयर गटाच्या अंतिम सामन्यातही महाराष्ट्राच्या नीलेश माळवे, गुरुप्रसाद गवळी , सोमनाथ पोफळे , प्रवीण किंगरे , विजय बोडके, जयंत चिखले आणि संकेत मदेवाड यांनी  चांगला खेळ केला परंतु त्यांना मध्य प्रदेशकडून हार पत्करावी लागल्यामुळे राजतपादक मिळाले. तर सब ज्यूनीयर मिश्र दुहेरीतही महाराष्ट्राच्या हिमांशू पोखरीया आणि गौरी सिंग यांनाही चांगला खेळ करून अंतिम फेरीत धडक मारली परंतु त्यांना अंतिम लढतीत गुजराथकडून हार पापत्करावी लागली. महाराष्टाच्या संघाला सतीश नावडे, राहुल धोत्रे, आशिष ओबेरॉय आणि राहुल पेठकर यांनी चांगले मार्गदर्शन केले. 
महाराष्ट्राच्या या यशाबद्दल टेनिस व्हॉलीबॉल या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, सचिव आनंद खरे, सहसचिव गणेश माळवे, क्रीडा संघटक अशोक दुधारे, खासदार संजय जाधव, किशोर चौधरी  आणि सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News