२७व्या राष्ट्रीय तलवारबजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना विजेतेपद.

Nov 13, 2019

नाशिक दि. १३ नोव्हे. :-  दिनाक ८ ते १२ नोव्हेबर, २०१९ दरम्यान भोपाल, मध्यप्रदेश येथ  ज्युनियर आणि वरिष्ठ गटाच्या २७ व्या  राष्ट्रीय तलवारबजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धात महाराष्ट्राच्या मुलांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन या स्पर्धचे विजेतेपद पटकावके.   एस.एस.सी.बी.आर्मीच्या संघाविरुध्द झालेल्या अंतिम लढ़तीत महाराष्ट्राच्या अदीत्य अंगल, धनंजय (कोल्हापुर), ऋत्विक शिंदे(नाशिक), अभय शिंदे, दुर्गेश जहागीरदार(औरंगाबाद), तन्मय घोडके(अ. नगर), शंकर(नांदेड़) या खेळाडूनी दर्जेदार खेळ करुन बलाढ्य आर्मीच्या संघावर ८-६ अशी मात करुन  विजेतेपदवर आपली मोहर उमटवली. या उत्कृष्ट कामगीरीच्या आधारे महाराष्ट्राच्या मुलांनी  सर्वसाधारण विजेतेपदही आपल्या नावे  करण्यात यश मिळविले. या स्पर्धेमध्ये विवीध राज्याच्या २९ संघानी सहभाग घेतला.
विजेत्या संघाना प्रमुख पाहुणे मध्य प्रदेशचे गृहमंत्री पी.सी.शर्मा, भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे सचिव बशीर खान, खाजिनदार अशोक दुधारे यांच्या हस्ते मेडल्स, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. 
महाराष्ट्राच्या खेळाडूच्या या यशाबद्दल महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीड़ा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीड़ा अधीकारी रविंद्र नाईक, क्रीडा समीक्षक आनंद खरे आदींनी अभिनंदन केले. 
अंतिम निकाल –
 मुले – १) महाराष्ट्र – प्रथम
२) एस.एस.सी.बी.आर्मी – दुसरा क्रमांक 
३) छत्तीसगड.- तिसरा क्रमांक 
मुलीं- १) मणिपुर –  प्रथम 
२) पंजाब – दुसरा क्रमांक  
३) केरळ.- तिसरा क्रमांक  

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News