१०६ वर्षा नी नाशिकला गोल्फ स्पर्धाचे आयोजन.नाशिक गोल्फ हब व्हावे यासाठी संपूर्ण सहकार्य – क्रीडा संचालक , ओमप्रकाश बोकारीया (आय.ए.एस.)

Nov 15, 2019

तब्बल १०६ वर्षानी नाशिक मध्ये खुल्या गटाच्या  गोल्फ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
नाशिकच्या निफाड़ तालुक्यामध्ये रिटा.विंग कमांडर प्रदीप बागमार  यांनी त्यांच्या २० एकर जागेत भव्य असे  गोल्फ कोर्स (मैदान) तयार केले आहे. रिव्हर साईड गोल्फ कोर्स या नावाने नावारूपाला आलेल्या  याच गोल्फ कोर्सवर या खुल्या गटाच्या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे औपचारिक उदघाटन महाराराष्ट्राचे क्रीड़ा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त (संचालक) ओमप्रकाश बोकारिया  यांनी स्वतः गोल्फ खेळून  या स्पर्धेचे औपचारीक उदघाटन केले. यावेळी नाशिक जिल्हा क्रीड़ा अधीकारी रविंद्र नाईक, या स्पर्धेचे आयोजन प्रमुख विंग कमांडर प्रदीप बागमार, क्रीडा संघटक राजीव देशपांडे, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, क्रीडा समीक्षक आनंद खरे, क्रीड़ा अधीकारी अविनाश टिळे, कुस्तीचे अध्यक्ष रविंद्र मोरे, मा. शिक्षण सभापती राजेन्द्र मोगल, या स्पर्धेचे समन्वयक  नितिन हिंगमीरे, या स्पर्धेचे तांत्रिक समिती प्रमुख ब्रीगेडियर सूद,  रमेश मारवाडी, मधुकर देशमुख, , आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना बोकारीया यांनी  या जागेमध्ये  गोल्फसाठी केलेल्या सुवीधाचे कौतुक केले आणि येथे लहान मुलांपासून ते वरिष्ठापर्यंत सर्वांना ही गॉल्फची सुविधा करून दिली आहे यासाठी विंग कमांडर प्रदीप बागमार आणि नाशिकच्या आयोजकांचे आभार मानले तसेच नाशिक हे गोल्फ हब म्हणून नावारूपाला यावे यासाठी महाराष्ट्र शाशनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य आणि सुविधा दिल्या जातील असे सांगितले. या स्पर्धेत नाशिकबरोबरच देवळालीच्या गोल्फ कोर्सचे दर्जदार खेळाडू, तसेच, मुंबई, पुणे. ठाणे, औरंगाबाद, नागपूर अश्या विविध भागातून ६२ गोल्फपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्पर्धात पदक मिळविल्या दर्जदार खेळाडूंचा समावेश आहे.  आज उदघाटनानंतर उपस्थित खेळाडूंनी सराव केला.
उद्या दि १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता या स्पर्धेला सुरवात होणार असून तीन सत्रात स्पर्धा खेळविली जाणार आहे.  तर रविवार दिनांक १७ नोव्हेंबरलाही अश्याच प्रकारे तीन सत्रात स्पर्धा खेळविली जाणार आहे  अशी माहिती स्पर्धा संयोजक प्रदीप बॅगमर आणि नितीन हिंगमिरे यांनी दिली. 
 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News