संजना जागतापची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड.

Nov 17, 2019

नाशिक दि. १७ नोव्हेम्बर :– दिनांक २० ते २३ नोव्हेंबर, २०१९  दरम्यान नेवासा , जिल्हा अहमदनगर येथे १७ वर्षे वयोगटाच्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहाभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यासाठी  नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे  निवड चाचंणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमध्ये नाशिकच्या संजना जगतापने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले आहे. 
 या निवड चाचणी मध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्यातील ६२ खेळाडूना पाचारंण करण्यात आले होते.या ,६२ खेळाडूचा दर्जा तपासून यामधुन  महाराष्ट्राच्या संघासाठी निवड करण्यात आली. या अंतिम संघात नाशिकच्या संजना जागतापची निवड झाली आहे. याआधीही संजनाने  दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून सहभाग घेतला आहे.  
 संजना जगताप नाशिक रोड येथील र. ज  बिटको शाळेत  शिक्षण घेत असून ती गेल्या १० वर्षापासून नाशिकरोड, मुक्ती धाम जवळील  रेणुका क्रीडा असोसिएशन येथे  मनोज म्हस्के आणि निखिल कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. तीला शाळेचे क्रीडा शिक्षक  प्रद्युन्म  जोशी , जयश्री उदार मॅडम, कैलास आरोटे यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. संजनाच्या या यशाबद्दल  र. ज  बिटको शाळेच्या मुख्याध्यापक ,   नाशिक जिल्हा हॉलीबॉल असोसीएशनचे अध्यक्ष, आनंद खरे,सचिव रामदास होते, क्रीड़ा संघटक अशोक दुधारे,रेणुका क्रीडा असोसिएशनचे पदाधीकारी आदीनी अभिनंदन केले आणि राष्ट्रीय स्पर्धासाठी शुभेच्या दिल्या. 
 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News