नेवासा दि. २४नोव्हेंबर- ,,क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा आधीकारी कार्यलय यांच्या वतीने आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशंन व त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने सुरू असूलेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत आज खेळल्या गेलेल्या
अंतिम सामन्यात प्रथमच अंतिम फेरीत दाखल झालेल्या राजस्थानच्या संघाने गतविजेत्या पश्चिम बंगालला ३-१ असे पराभूत करुन या १७ वर्षे मुलींच्या राष्ट्रीय शालेय व्होलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
अगदी संघर्षपूर्ण संघर्षपूर्ण खेळल्या गेलेल्या या लढ़तीत दोन्हीही संघाच्या खेळाडूनी तोडीस तोड खेळ केला. दोन्हीही संघाच्या स्मेशर्सनी कधी जोरदार स्मेशेस लगावून तर कधी हलकेसे टैपिंग करुन तर कधी नेटजवळ ड्रॉप्स टाकून गुणफलक हालता ठेवला.
पहील्या सेटमध्ये राजस्थानच्या खेळाडूनी जोमाने खेळ करुन पहीला सेट २५-१७ असा जिंकून आघाडी मिळवीली. परंतु दुसऱ्या सेटमध्ये बंगालच्या खेळाडूनी एकमेकात चांगला समन्वय साधुन दूसरा सेट २५-२२ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. तीसरा सेट तर फारच रंगला.
तिसऱ्या सेटमध्ये राजस्थानने प्रथमपासून २१- १७ अशी मोठी आघाडी घेतली. मात्र बंगालच्या खेळाडूनी नंतर चांगले प्रयत्न करुन २३-२३ बरोबरी साधली. नंतर मात्र राजस्थानच्या खेळाडूनी सय्यमाने खेळ करुन हा सेट २७-२५ असा जिंकून २-१ अघाडी मिळवली. तर चवथ्या सेटमध्येही राजस्थानच्या खेळाडूनी हीच लय कायम ठेवत चांगले स्मेशेस लागवताना सुन्दर बचाव करुन बंगालच्या स्मेशर्सला चोख उत्तर दिले. त्यांच्या या सांघिक प्रयत्नामुळे राजस्थानच्या हा सेट २५-२१ असा जिंकून या स्पर्धाचे विजेतेपदही आपल्या नाव करत एक नवा इतीहास घड़विला.राजस्थानच्या विजेत्या संघाकडून खेळणाऱ्या लावप्रीत कौर, मांडीत कौर, टीना चौधरी , अनिता कुमारी, लक्ष्मी जानीयांनी चांगले स्मेशेस लागावले तर त्यांना लिफ्टर सोनू सपट हिने संपूर्ण स्पर्धेत आपल्या स्मेशर्सना सुंदर पासेस पुरवून मोलाची भूमिका पार पडली. गट विजेत्या बंगालकडून आयुष्यका धोली, श्रीनिका देबनाथ, ऋभाश्री तिवारी, श्रेया घोष, रौबी भादुरी यांनी चांगले स्मेशेस लगावून आणि ब्लॉक्स करून आपले विजेतेपद टिकविण्याचे चांगले प्रयत्न केले परंतु त्यांना या सामन्याचे विजयात रूपांतर करण्यात अपयश आल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
विजेत्या खेळाडूना प्रमुख पाहुणे त्रिमुर्ति शिक्षण संस्थाचे अध्यक्ष आबासाहेब घाडगे -पाटिल, त्रिमुर्ति क्रीड़ा संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्नेहल घाडगे-पाटिल, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख श्री शैलेंद्र मिश्रा, श्री परीहार, अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधीकारी श्रीमती कविता नावंदे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष पार्थ दोषी आदीच्या हस्ते आकर्षक चषक , मेडल्स आणि प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धाची तंत्रीकी बाजू व्हॉलीबॉल असोसिएशसनचे अंतरराष्ट्रीय पंच एजाज शेख, राष्ट्रीय पंच आदिनाथ कोल्हे यांच्य्या अधिपत्याखाली राष्ट्रीय पंचानी यशस्वीपणे पार पडली.
. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भारतीय शालेय महासघाचे प्रमुख श्री शैलेंद्र मिश्रा, श्री परिहार, श्री निसार खान यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती क्रीडा संकुलचे प्रमुख आणि सर्व कार्याकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नेवासा येथिल त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या परिसरात तयार केलेले प्रकाश झोताची सुविधा असलेले चार सुंदर क्रीडांगणे, प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंचे निवास आणि भोजन व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे करण्यात आल्यामुळे सहभागी संघाचे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, भारतीय शालेय खेळ प्राधिकरणाचे प्रमुख या सर्वानी समाधान व्यक्त केले.
अंतिम निकाल
1) राजस्थान – विजेता (सुवर्णपदक )
2) पश्चिम बंगाल – उपविजेता (रौप्य्पादक)
3) तमिळनाडु – तीसरा क्रमांक (कास्य पदक)






