खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी

Nov 26, 2019

नवी दिल्ली : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी  योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशात क्रीडा क्षेत्राच्या विकास व प्रोत्साहनासाठी 2017 मध्ये ‘खेलो इंडिया’ ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील 28 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 173  प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 226 कोटी 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत एकूण 580 कोटी 62 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत एकूण 8  प्रकल्पांसाठी 90 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांनी  राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News