नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सर्वांच्या सहकार्याने या स्पर्धेचे चांगल्या प्रकारे आयोजन करण्याचा निर्धार – रवींद्र नाईक ( जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक.)

Nov 28, 2019

नाशिक दिनांक २८ नोव्हेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे वतीने जिल्हा  क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक  मार्फत दिनांक २९ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर  दरम्यान  १७ वर्षे मुले आणि मुलींच्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पधेचे आयोजन  करण्यात आले आहे.
या स्पधेत महाराष्ट्रातील आठ विभागाचे मुलांचे  आठ  आणि  मुलींचे आठ  असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये  यजमान नाशिक विभागासह  नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि  औरंगाबाद असे आठ विभागाचा समावेश असणार आहे.  याप्रमाणे या स्पधेत एकूण १२८  मुले, १२८ मुली असे २५६ खेळाडू त्यांचे १६ संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. तसेच  प्रत्येक विभागातून  ५ मुले आणि ५ मुली  असे  ८० खेळाडू निवड चाचणीसाठी उपस्थित  राहणार आहेत .
खेळाडूंची निवासव्यवस्था विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आलेली आहे.
  या स्पर्धाचे आयोजन  नाशिकच्या  महात्मानगर क्रिकेट मैदान, गोल्फ क्लब क्रिकेट  मैदान आणि बॉईज  टाऊन पब्लिक  स्कुल क्रिकेट मैदान  या तीनही मैदानांवर होणार आहेत.
या स्पधेचे उद्घाटन दिनांक ३० नोव्हेम्बर रोजी सकाळी ०८. ३० वाजता महात्मानगर क्रिकेट  मैदान, महात्मानगर, नाशिक  येथे  होणार असून या प्रसंगी उद्घाटक म्हणून नाशिक जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी   योगेंद्र चौधरी, क्रीडा उपसंचालक  चंद्रकांत कांबळे , नाशिक जिल्हा  क्रिकेट असोसिएशनचे  अध्यक्ष धनपाल शहा, सचिव समीर रकटे तसेच इतर मान्यवर पदाधीकारी उपस्थितीत राहणार आहेत. तसेच  या स्पर्धेस नाशिकचे  रणजी खेळाडू मौर्तुझा ट्रॅकवाला, सत्यजित  बच्छाव यांचीही उपस्थिती  राहणार आहे. या स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व मुलामध्ये नाशिकच्या सेंट लौरन्स शाळेचा संघ तर मुलीमध्ये  जळगावच्या साने गुरूजी कन्या विद्यालय, अमळनेरचा संघ नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करण्यात आहे. या संघात  जळगावच्या साने गुरूजी कन्या विद्यालय, अमळनेरची राष्ट्रीय खेळाडू साक्षी पाटील हीचा समावेश आहे. 
या सामन्यांचे थेट समालोचन क्रिक हिरोज  या ॲपवर करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक मुलांच्या आणि  मुलींच्या सामन्यातील उत्कृष्ट्ट खेळाडूस मॅन ऑफ  द मॅच, आणि संपूर्ण स्पर्धेतील मुलांच्या आणि मुलींच्या  सर्वोत्कृष्ट खेळाडूस  मॅन ऑफ  द सिरीज चा किताब प्रदान केला जाणार आहे.  तसेच या स्पर्धेतील मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रथम , दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविणाऱ्या संघाला आकर्षक  करंडक प्रदान करण्यात  येणार आहे.  या स्पर्धासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे  तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. 
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय शालेय क्रिकेट  स्पधेसाठी सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाची निवड  करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून निवड झालेला मुलांचा संघ  दिनांक ३ ते  ८ जानेवारी , २०२० दरम्यान  दमण (दमण व दीव) येथे आयोजित राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे.  तर मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धा  मेहबूबनगर (तेलंगाणा) येथे होणार आहेत.अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाई यांनी दिली. 
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिकचे जिल्हा  क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी महेश पाटील , क्रीडा कार्यालयाचे सर्व सरकारी तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी सर्वेश देशमुख आदी परिश्रम घेत आहेत. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News