मुला-मुलींना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी गावा-शहरांमध्ये नियमीत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे ही गरजेचे बाब आहे. यामधून मुलामुलींचा सर्वांगीण विकास तर होतोच आणि मुला-मुलींमध्ये एकात्मतेची भावना वाढते असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा सौ. देवयानी डोणगांवकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्होलीबॉल स्पर्धाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे
म्हणुन त्या बोलत होत्या .
महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने,श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान,गंगापुर यांच्या वतीने युथ गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे आयोजन गंगापूर येथे करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गंगापूरच्या नगराध्यक्ष माननीय सौ वंदना पाटील, उपनगराध्यक्षा सौ मंगलाताई राजपूत, महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष पार्थ दोषी, सचिव बाळासाहेब सूर्यवंशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा एकनाथ साळुंखे, आयोजन समितीचे सचिव आबासाहेब शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून मुला-मुलींच्या आठ विभागाने सहभाग नोंदवला असून या स्पर्धेत एकूण २८ सामने होणार आहेत. या स्पर्धासाठी आठ मुलांच्या आणि आठ मुलीच्या “अ ” आणि “ब” अश्या दोन गटात विभागणी करण्यात आली असून . मुलांच्या ‘अ’ गटांमध्ये पुणे विभाग,अमरावती विभाग,औरंगाबाद विभाग व मुंबई विभागाचा संघ तर ‘ब’ गटातमध्ये नागपूर विभाग,कोल्हापूर विभाग,लातूर विभाग व नाशिक विभागाचा संघ. तर मुलींमध्ये ‘अ’ गटामध्ये पुणे विभाग,नाशिक विभाग,औरंगाबाद विभाग,मुंबई विभाग तर ‘ब’ गटांमध्ये नागपूर विभाग,कोल्हापूर विभाग,लातूर विभाग व अमरावती विभागाचा सहभाग आहे.
उदघाटनानंतर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुलांमध्ये यजमान औरंगाबादच्या संघाने सुंदर स्मेशेस आणि ब्लॉक्सचे प्रदर्शन करून मुंबई विभागाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आणि विजयी सलामी दिली. तर कोल्हापूर विभागाच्या संघाने नाशिक विभागाचा पराभव करून विजयी सुरवात केली. मुलींच्या गटात नाशिक विभागाच्या संघाने पहिल्या सामन्यात यजमान औरंगाबाद विभागाच्या संघाला पराभूत करून विजय प्राप्त करत या स्पर्धेत चांगली सुरवात केली.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांची निवड करण्यात येणार असून निवड झालेले खेळाडू केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष पार्थ दोषी आणि सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिली.
तांत्रिक समिती प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच एजाज शेख,
हे काम बघत असून असून पंच कमिटीचे अध्यक्ष साहेबराव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय पंच आदिनाथ कोल्हे आणि राष्ट्रीय पंच पॅनल आपली जबाबदारी पार पडत आहेत.
आजच्या स्पर्धेचे निकाल :-
मुले :- १) औरंगाबाद विभाग विजयी विरुद्ध मुंबई विभाग ( २-० )
२) कोल्हापूर विभाग विजयी विरुद्ध नाशिक विभाग ( २-० )
३) औरंगाबाद विभाग विजयी विरुद्ध पुणे विभाग ( २-१ )
४) नागपूर विभाग विजयी विरुद्ध नाशिक विभाग ( २-० )
५) पुणे विभाग विजयी विरुद्ध मुंबई विभाग (२-०)
मुली :-
१) नाशिक विजयी विरुद्ध औरंगाबाद ( २-०)
२) मुंबई विभाग विजयी विरुद्ध पुणे विभाग (२-०)
३) नागपूर विभाग विजयी विरुद्ध अमरावती विभाग (२-०)
४) कोल्हापूर विभाग विजयी विरुद्ध लातूर विभाग ( २-०)






