नाशिक दिनांक ०६ डिसेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत ने जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक ०८ ते १० डिसेम्बर, २०१९ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या राष्ट्रीय शालेय तालवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या पंचवटी , हिरवाडी येथील विभागीय क्रीडा संकुलच्या बंदिस्त हॉल मध्ये आयोजित
या स्पधेमध्ये भारताच्या २७ राज्याचे मुलांचे आणि मुलींचे ४४ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये यजमान महाराष्ट्रासह अरुणाचल, आसाम, अंदमान – निकोबार, अरुणाचल प्रदेश, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दादरा-नगर हावेली, दीव -दमण, दिल्ली , गोवा, गुजराथ, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, झारखंड, कर्नाटक केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओरिसा, पौंडेचरी, पंजाब , राजस्थान सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सी. बी. एस. सी. , ओ बी.एस. ओ . ओ., केन्द्रीय विद्यालय संघटन, आय.पी. एस. सी., डी, ए. व्ही., सी. आय. एस. सी. व्ही. अश्या संघांचा समावेश असणार आहे. याप्रमाणे एकूण या सहभागी २१० मुले आणि १७८ मुलीं, ४६ प्रशिक्षक आणि २७ संघ व्यवस्थापक यांचा समावेश असणार आहे. तर या स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी असोसिएशचे अधिकृत पंच, आणि तांत्रिक प्रमुख असे ३० जणांचाही सहभाग असणार आहे. या स्पर्धेमध्ये ईपी. फॉईल आणि सॅबर या तीन प्रकारांचा समावेश असणार आहे.

या स्पर्धासाठी विभागीय क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये नऊ पिस्ट (क्रीडांगणे ) तयार केले आहेत. तर या स्पर्धेत इलेकट्रोनिक बोर्डशी जोडलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॉर्डस ( तलवार) वापरले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष सामना खेळणाऱ्या खेळाडूला मिळणारे गुण थेट इलेकट्रोनिक बोर्डवर दिसणार आहेत. या स्पर्धेत या तीन गटात प्रथम, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना मेडल्स दिले जाणार आहेत, तर या स्पर्धेत आपल्या दर्जदार खेळाच्या आधारे सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाना सर्वसाधारण विजेतेपदाचा, उपविजेतेपदाचा आणि तिसरा क्रमांकाचा असे आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य असणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आली आहे. या स्पर्धेत
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, आणि नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली
तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी प्रकाश पवार, खिल्लारे, महेश पाटील, अरविंद चौधरी, संदीप ढाकणे, श्रीमती उदार, सय्यद , जिल्हा तलवारबाजींचे सचिव राज्य शिंदे, उपाध्यक्ष नितीन हिंगमिरे आणि सर्व सरकारी परिश्रम घेत आहेत.