नाशिक :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक ०८ ते १० डिसेम्बर, २०१९ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय तालवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या पंचवटी , हिरवाडी येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित
या स्पर्धेला आज मोठया उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन नाशिक पूर्वचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढीकले आणि नाशिकच्या नियोजन मंडळाचे अधिकारी योगेंद्र चौधरी, यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्कुल गेम फेडेरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी परमेश्वर जाठ, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्र छाजेड, साहेबराव पाटील, आनंद खरे, राजू शिंदे, आंतरराष्ट्रीय पदक विजेती धावपटू संजीवनी जाधव, एस. व्ही. के. टी. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनखासकर, या स्पर्धेचे आयोजक तथा नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना आमदार राहुल ढीकले यांनी सांगितले की मी देखील अनेक वर्षे कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्पर्धात सहभाग घेतला आहे. त्यामुळे खेळामुळे होणारे फायद्यांची मला जाणीव आहे. खेळामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे खेळ खेळाडूंना सक्षम बनवतो. मात्र या खेळाच्या माध्यमातूनच सक्षम आणि बलदंड देशाची जडणघडण होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या खेळाच्या प्रगतीबरोबरच देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा असे आवाहन केले. या वेळी नियोजन मंडळाचे अधिकारी योगेंद्र चौधरी, परमेश्वर जाठ, डॉ. सोनखासकर, चंद्रकांत कांबळे यांनीही खेळाडूंना संभोदित केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक या स्पर्धचे आयोजन प्रमुख ताठ जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की खेळाडूंच्या खेळातील चांगल्या प्रगतीनुसार त्यांना महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी आणि इतर सर्व सुविधा देण्यात येत आहेत याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले. उदघाटनानंतर तलवारबाजीच्या नियमावलीप्रमाणे ईपी. फॉईल आणि सॅबर या तीन प्रकारांच्या वैयक्तिक स्पर्धाना सुरवात झाली. यामध्ये महाराष्ट्राच्या निखिल वाघ आणि अमेय विधाते यांची सॅबर या प्रकारात चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदकाची कमाई केली. तर मुलांच्या सॅबर प्रकारात महाराष्ट्राच्या प्रियंका लोढां ने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून कास्य पदक आपल्या नावे केले.
. या स्पधेमध्ये भारताच्या अरुणाचल, आसाम, अंदमान – निकोबार, अरुणाचल प्रदेश, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दादरा-नगर हावेली, दीव -दमण, दिल्ली , गोवा, गुजराथ, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, झारखंड, कर्नाटक केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओरिसा, पौंडेचरी, पंजाब , राजस्थान सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सी. बी. एस. सी. , ओ बी.एस. ओ . ओ., केन्द्रीय विद्यालय संघटन, आय.पी. एस. सी., डी, ए. व्ही., सी. आय. एस. सी. व्ही. आणि महाराष्ट्र अश्या २७ राज्यांचा समावेश आहे.
नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या हॉलमधील नऊ पिस्टवर (क्रीडांगणे ) आंतरराष्ट्रीय दर्जाचे इलेकट्रोनिक सॉर्डस ( तलवार) वर स्पर्धा खेळावेल्या वापरले जात असून खेळाडूला मिळणारे गुण थेट इलेकट्रोनिक बोर्डवर सर्वांना दिसत आहेत.
या स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी असोसिएशचे अधिकृत पंच, आणि तांत्रिक सदस्य असे ३० जणांचा संच या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळत आहे.
महाराष्ट्राची चांगली सुरवात :- राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी कायम चांगली राहिलेली आहे. मागील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने रौप्य पदकाची कमाई केली होती.या स्पर्धेतही यजमान महाराष्ट्राच्या निखिल वाघ आणि अमेय विधाते यांची रौप्य आणि कास्य पदकाची कमाई करून चांगली सुरवात केली आहे.
आज दिवसभर फॉईल, ई. पी. आणि सॅबर या तिनंही प्रकारच्या वैयक्तिक स्पर्धा खेळविल्या जात आहेत. तर उद्या दिनांक ०९ डिसेम्बर रोजी या तीनही प्रकारामध्ये सांघिक स्पर्धा खेळविल्या जातील अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि राजू शिंदे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य असणार आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली
तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी प्रकाश पवार, खिल्लारे, महेश पाटील, अरविंद चौधरी, सौ कांबळे, संदीप ढाकणे, श्रीमती उदार, सय्यद , जिल्हा तलवारबाजींचे सचिव राज्य शिंदे, उपाध्यक्ष नितीन हिंगमिरे, जय शर्मा, राहुल फडोळ आणि सर्व सरकारी परिश्रम घेत आहेत.
आजचा निकाल वैयक्तिक प्रकार –
मुले – सॅबर १) आर्यन चरणसिंग (हरयाणा ) – सुवर्ण पदक
२) निखिल वाघ (महाराष्ट्र ) – रौप्य पदक
३) अमेय विधाते ( महाराष्ट्र ) आणि लक्ष्य शर्मा ( जे अँड के ) – कास्य पदक
मुली – ई . पी – . १) अंजली बाथ्रा (मध्य प्रदेश ) – सुवर्ण पदक
२) चंद्रिका देवी केइश्मा (मणिपूर) – रौप्य पदक
३) प्रियांका लोढा ( महाराष्ट्र ) आणि अवीशी दाबस ( दिल्ली ) – कास्य पदक






