६५ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा , नाशिक. महाराष्ट्राच्या खेळाडूंची शानदार कामगिरी. मुलांना सॅबर मध्ये सुवर्ण तर मुलींना फॉईल मध्ये सुवर्ण

Dec 9, 2019

नाशिक दिनांक ०९  डिसेंबर  :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत  जिल्हा  क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक  मार्फत दिनांक ०८ ते १०  डिसेम्बर, २०१९   दरम्यान  १७ वर्षे मुले आणि मुलींच्या ६५ व्या राष्ट्रीय  शालेय  तालवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या पंचवटी , हिरवाडी येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित  
या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदकाची कमाई केली. आज खेळल्या गेलेल्या सांघिक स्पर्धेत मुलींच्या फॉईल या प्रकारात महाराष्ट्राच्या  वैभवी इंगळे (मुंबई ),वैदेही लोहीया ( औरंगाबाद), अभरीकांती वडनेरे (औरंगाबाद ),  अरुशी सिंग (नागपूर ). यांनी अंतिम सामन्यात गुजराथ संघाचा ०६- ०४  असा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नांव कोरले. या प्रकारात तामिळनाडू आणि मणिपूरच्या संघानी कास्य पदक मिळविले. 
मुलांच्या  सॅबर प्रकारच्या सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या  निखिल वाघ ( औरंगाबाद),  अमेय विधाते (सोलापूर), आदित्य वाहूळ ( औरंगाबाद), वरद परांजपे (मुंबई) यांनी अंतिम लढतीत जम्मू- काश्मीरच्या खेळाडूंना संधी न देता हा सामना ०८- ०२ अश्या फरकाने जिंकून सुवर्णपदक पटकावले. तर हरयाणा आणि गुजराथ यांनी कास्य पदक मिळविले. 
याआधी पार पडलेल्या वैयक्तिक  सॅबर प्रकारात मुलीमध्ये  महाराष्ट्राच्या कशिश भराड हिने सुंदर खेळ करून अंतिम लढतीत चंदीगडच्या लावण्या राणा हिला ०७- ०३ असे पराभूत सुवर्णपदकाची  कमाई केली. या प्रकारात अबीदेवी लैश्राम आणि गौरी सोळंकी ( दोघीही गुजराथ ) यांनी कास्य पदक मिळविले. मुलीच्या  ई.पी. प्रकारात महाराष्ट्राच्या प्रियाका लोढाने चांगला खेळ करून कास्य पदक मिळविले. 
या स्पर्धेत वैयक्तिक ई. पी. प्रकारात मुलांमध्ये हरयाणाच्या विशालरिशी पालने अंतिम लढतीत मध्य प्रदेशच्या भव्यसिंग सिसोदीयाला  पराभूत करून सुवर्णपदक पटकावले तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या कानिशींग (मणिपूर )आणिहर्षव झाला (गुजराथ) यांना कास्य पदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या सॅबर प्रकारात हरीयाणाच्या आर्यन चरणसिंग आणि महाराष्ट्राच्या निखिल वाघ यांच्यात 
खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत चांगलीच चुरस दिसून आली. निखील वाघाने सुरवातीला ३-२ अशी आघाडी मिळविली. मात्र त्यानंतर  आर्यन चरणसिंगने आक्रमक धोरण स्वीकारून आपल्या निर्धारित वेळात सहा गुणांची कमाई केली आणि ही लढत जिंकून सुवर्णपदक मिळविले.
 या स्पर्धेत सुवर्ण , रजत आणि कास्य पदक मिळणाऱ्या खेळाडूंना आजचे प्रमुख पाहुणे विंग कमांडर प्रदीप बागमार तसेच अजिंक्य दुधारे, राजू शिंदे , महेश पाटील,  नितीन हिंगमिरे आदींच्या हस्ते पदके प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.  
उद्या दि. १० डिसेम्बर रोजी  सकाळी सांघिक प्रकारचे उपांत्य आणि अंतिम सामने खेळविले जाणार आहेत अशी माहिती आयोजन प्रमुख जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि  तांत्रिक समिती प्रमुख राजू शिंदे यांनी दिली .  या स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी असोसिएशचे अधिकृत पंच, आणि तांत्रिक सदस्य असे  ३० जणांचा संच या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळत  आहे. . 
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी प्रकाश पवार,  खिल्लारे, महेश पाटील, अरविंद चौधरी, सौ कांबळे, संदीप ढाकणे, श्रीमती उदार, सय्यद , जिल्हा तलवारबाजींचे सचिव राज्य शिंदे, उपाध्यक्ष नितीन हिंगमिरे, जय शर्मा, राहुल फडोळ आणि सर्व सरकारी परिश्रम घेत आहेत. 
आजचे अंतिम निकाल 
सांघिक  प्रकार – 
 मुले –  सॅबर  १) महाराष्ट्र   – सुवर्ण पदक 
                   २)  जम्मू – काश्मीर – रौप्य पदक 
                   ३) हरयाणा आणि गुजराथ  – कास्य पदक 
  सांघिक – मुली – फॉईल – 
१) महाराष्ट्र – सुवर्णपदक 
२) गुजराथ – रौप्य पदक 
३) तामिळनाडू  आणि मणिपूर – कास्य पदक  
 
 वैयक्तिक प्रकार – 
 मुले –  फॉईल   
१) विश्वजीत कुलकर्णी (महाराष्ट्र )  – सुवर्ण पदक 
 २) एस. के. अरविंद  (तामिळनाडू ) – रौप्य पदक 
 ३)  महिंद्रा कुमार  (हरयाणा ) आणि वॉशिंग्टन टॉमबॉई  (मणिपूर ) – कास्य पदक 
मुले – ई. पी.- 
१) विशाल रिशीपाल ( हरयाणा)- सुवर्ण 
२) भव्यसिंग सिसोदिया ( मध्य प्रदेश) – रजत पदक 
३) कानिशींग कांगावाम (मणिपूर) आणि हर्षवर्धन झाला ( गुजराथ)    
मुली – ई . पी – .
 १) अंजली बाथ्रा (मध्य प्रदेश )  – सुवर्ण पदक 
२)  चंद्रिका देवी केइश्मा  (मणिपूर) – रौप्य पदक 
३)  प्रियांका लोढा  ( महाराष्ट्र ) आणि अवीशी दाबस ( दिल्ली ) – कास्य पदक 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News