भारताचे जेष्ठ नेते आणि सामाजिक क्षेत्रात तसेच क्रीडा क्षेत्रात ही फार मोठे योगदान असलेले मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक १३ ते १५ डिसेम्बर, २०१९ दरम्यान नाशिक येथे वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ता स्पर्धेला आज मोठया उत्साहात सुरवात झाली.
या स्पर्धेचे उदघाटन निफाड़, नाशिकचे आमदार दिलीप बनकर आणि मराठा विद्या प्रसार क समाज संस्थेचे संचालक तथा राष्ट्र वादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले याच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्धन स्वामी संस्थेचे वीश्वस्थ मधुकर जेजुरकर, भारतीय तलवरबजी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, सचिव डॉ उदय डोंगरे, कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे. आनंद खरे आदी मान्यवर उपस्तीत होते. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले की आपल्या भारताचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. याचबरोबर त्यांचे क्रीडा क्षेत्रांतही मोलाचे योगदान आहे. त्यामुळे खेळाडूंनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा असे सांगितले. तसेच तलवारबाजी या खेळासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुविधा आणि सहकार्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी नानासाहेब महाले यांनीही मा. शरद पवार यांच्या कार्याचा तपशील नमूद करून खेळाडूंना शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्तिविक राज्य सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी केले. या प्रसंगी तलवारबाजी या खेळात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्या तील मानाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि क्रीडा संघटक यांचाही प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध ३२ जिल्हाच्या एकूण ५३५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून यामध्ये आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू अजिंक्य दुधारे, कोमल कौर- दुधारे, स्नेहल पवार, तुषार आहेर, काशीस भरड, अक्षय देशमुख, दुर्गेश जहागीरदार, अदिती सोनावणे, अस्मिता दुधारे, तेजस्वनी टर्ले आदींचा समावेश आहे. या स्पर्धेत ईपी. फॉईल आणि सॅबर या तीन प्रकारांचा समावेश आहे.
जनार्दन स्वामी मंदिरच्या हॉलमध्ये सहा पिस्टवर (क्रीडांगणे ) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इलेकट्रोनिक सॉर्डस ( तलवार) वर स्पर्धा खेळाविल्या जात असून खेळाडूला मिळणारे गुण थेट इलेकट्रोनिक बोर्डवर सर्वांना दिसत आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशचे अधिकृत पंच, आणि तांत्रिक सदस्य असे २२ जणांचा संच या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळत आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू शिंदे, नितीन हिंगमिरेयांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तलवारबाजी असोसिएशनचे सर्व कारकर्ते, वरिष्ठ खेळाडू आणि सरकारी परिश्रम घेत आहेत.






