महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि परवानगीने नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नाशिकमध्ये नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या ज्युदो हॉलमध्ये आज दिनांक ३० जून , २०१९ रोजी मोठया उत्साहात प्रारंभ झाला. भारतात प्रथमच या पहिल्या ज्युदो प्रिमीयर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्हातील ८१ खेळाडू सहभागी झाले आहेत. या ८१ खेळाडूंमध्ये एशियाड, कॉमनवेल्थ आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केलेले अजिंक्य वैदय (नाशिक), रोहिणी मोहिते, शुभांगी राऊत (नागपूर), हर्षल थेटे (साई ), स्नेहल खवारे (क्रीडा प्रभोदनी ,पुणे ), श्रावण शेंडगे (साई), राम अडसूळ (पुणे) अश्या दर्जदार खेळाडूंचा समावेश आहे. ज्युदो हा खेळ वैयक्तिक स्वरूपाचा असला तरीही ही प्रिमीयर लीग स्पर्धा सांघिक स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अंकाई अटॅकर्स, रायगड चैलेंजर्स, तुंग टायटन्स,शिवनेरी किंग्स,तोरणा टायगर्स,पन्हाळा पिलर्स, हरिहर हुंटर्स, लोहगड लिजंटस आणि चांदेरी क्रॅकर्स असे ९ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वरील प्रत्येक संघात या वजनी गटानुसार ४४ किलो, ४८ किलो, ५२ किलो, ५६ किलो, ५७ किलो, ६० किलो, ६६ किलो, ७३ किलो, ८१ किलो अश्या नऊ वजनी गटांच्या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेचे उदघाटन नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जेष्ठ क्रीडा संघटक तथा या स्पर्धेचे आयोजन सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे आणि अविनाश खैरनार, या स्पर्धेचे संयोजन प्रमुख रवींद्र मेतकर, साईचे ज्युदो प्रशिक्षक विजय पाटील, स्पर्धा संचालक योगेश धाडवे , या स्पर्धेचे समन्वयक योगेश शिंदे , चंद्रकांत आरोटे, नारायण गायधनी छत्रपती पुरस्कार प्राप्त तुषार माळोदे आदी मान्यवर उपस्तीत होते. या वेळी रवींद्र नाईक यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की ज्युदो या खेळाची नाशिकमध्ये ही पहिली प्रिमीयर लीग स्पर्धा आयोजन केल्यामुळे खेळाडूंना याचा फार चांगला फायदा होणार असून अश्या उपक्रमांना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून कायमच सहकार्य केले जाईल असे सांगितले. ज्युदोचे जेष्ठ मार्गदर्शक तथा संयोजन सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन यांनी सांगितले की प्रिमियर लीगची ही सुरवात आहे, खेळाडूच्या गुणवत्तेत प्रगती व्हावी हा या स्पर्धेच्या आयोजनामागील एकमेव उद्देश आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कणसे आणि योगेश शिंदे यांनी केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाना सुजित काळे, विनायक मिसाळ , सनी हाके, बाळकृष्ण धोंडगे, निखिल सुवर्णा, गिरीश नागरे सुहास विश्वासराव, मनींदरसिंग बिल्वाल आणि शिल्पा शेरीगर यांनी प्रायोजित केले आहे. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे, तर नाशिक जिल्हा खो -खो असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट दोन खेळाडूला रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत. उदघाटनानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरवात झाली. यामध्ये शिवनेरी किंग्स आणि तुंग टायटन्स यांनी आपले दोन साखळी सामने जिंकून ११५ गुणांसह बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. तर तोरणा टायगर्स ( १०० गुण ),हरिहर हंटर्स, (९५ गुण ), पन्हाळा पिलर्स ( ९५ गुण ) आणि अनकायी अटॅकर्स,( ८५ गुण ) यांनीही चांगली कामगिरी करून बाद फेरीत आपले स्थान पक्के केले. या स्पर्धाच्या चांगल्या आयोजनासाठी डॉ. रत्नाकर पटवर्धन, रवींद्र मेतकर, विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश धाडवे, माधव भट, योगेश शिंदे , तुषार माळोदे, स्वप्नील शिंदे, सुहास मैद, वैष्णवी कणसे, स्वाती कणसे, ऋषिकेश वाघचौरे,दुर्गा जाधव, नामदेव कचरे, संदीप पाटील आणि बाळकृष्ण धोंडगे आदी प्रयत्नशील आहेत.
नाशिकमध्ये राज्यस्तरीय जुदो लीग स्पर्धेचे आयोजन
लीग स्पर्धेमधून संघभावना जोपासण्यास मदत - रत्नाकर पटवर्धन, सचिव नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन...






