नाशिक :- भारताचे जेष्ठ नेते मा. श्री शरदचंद्र पवार यांचे सामाजिक क्षेत्रात तसेच क्रीडा क्षेत्रातही फार मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाला नमन करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून मध्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक मध्य विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किशोर शिरसाठ यांच्या वतीने आकाशवाणी जॉगिंग पार्क मैदान, गंगापूर रोड येथे दिनांक ०३ ते ०५ जानेवारी. २०२० दरम्यान नाशिक जिल्हास्तरीय खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सहकार्याने या नाशिक जिल्हास्तरीय खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे या स्पर्धांचे दुसरे वर्ष आहे. नाशिकमध्ये व्हॉलीबॉल या खेळाचे चांगले वातावरण आहे. तसेच नाशिकच्या व्हॉलीबॉल खेळाडूंना स्पर्धाची संधी मिळावी आणि त्यांच्या खेळात आणखी चांगली प्रगती व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागील वर्षांपासून या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या पहिल्या तीन संघाना आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे तर या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंनाही पारितोषिके दिली जाणार आहे.
या स्पर्धांना दिनांक ०३ जानेवारीरोजी सुरवात होणार असून दिनांक ०५ जानेवारी रोजी अंतिम सामना खेळविला जाईल आणि त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तरी नाशिक जिल्हातील जास्तीत जास्त संघानी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि दिनांक ०२ जानेवारी, २०२० पर्यंत आपलॆ प्रवेश अर्ज मित्र विहार क्लब, मेहेर सिग्नल, नाशिक येथे सादर करावे असे आवाहन किशोर शिरसाठ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी किशोर शिरसाट, मो, क्र. ९८९०३३९९९९, आनंद खरे,. मो. क्र. ७०८४०५३२२१, रामदास होते मो. क्र. ९९२२३३०७०२ यांच्याशी संपर्क करावा.






