नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कॅडेट, सब ज्युनियर, ज्युनियर आणि युथ गटाच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

Jan 2, 2020

नाशिक  – नाशिक जिल्हाकॅरम  असोसिएशनच्या वतीने  आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने , नाशिकच्या सी. बी. एस. जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नाशिक  येथे दिनांक ०३ आणि०४ जानेवारी २०२० दरम्यान  कॅडेट गट ( १२ वर्षे )  , सब ज्युनियर गट ( १४ वर्षे ) , ज्युनियर गट ( १८ वर्षे) आणि युथ गट ( २१ वर्षे )  या चार वयोगटाच्या मुलांच्या आणि मुलींच्या नाशिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे  आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख १४ जानेवारी. २०२० पर्यंत त्या – त्या वयोगटात असावी. 
 
या स्पर्धेतील  कामगिरीच्या आधारे या दोन्हीही गटासाठी नाशिक जिल्हा संघाची निवड केली जाणार असून हे निवड झालेले खेळाडू  रायगड येथे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धात नाशिकचे प्रतिनिधीत्व करतील. 
.जे खेळाडू या वयोगटात आहेत अश्या नाशिक जिल्ह्यातील  जास्तीत जास्त खेळाडूनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवहान नाशिक  जिल्हा कॅरम  असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. 
तरी सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनी शक्रवार दिनांक ०२ जानेवारी रोजी सकाळी ०९. ०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम  हुतात्मा स्मारक जवळ, सी,बी.एस नाशिक येथे उपस्थीत राहावे.  
अधीक माहीतीसाठी आनंद खरे मो. क्र. ७०३८०५३२२१ अशोक कचरे मो. क्र. प्रशांत भाबड मो. क्र .८९८३१९००८५ ,अथवा उमेश सेनभक्त  मो. क ८००७१२३४१५ यांच्याशी संपर्क करवा.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News