१० व्या मिशन ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धांना मोठया उत्साहात सुरवात खेळाडूंनी संधीचा फायदा घेऊन आपल्या खेळात प्रगती करावी – रवींद्र नाईक ( जिल्हा क्रीडा अधिकारी , नाशिक)

Jan 5, 2020

नाशिक दिनांक ०४ जानेवारी :- नाशिक जिल्हा तलवारबाजी आणि महाराष्ट्र तलवारबाजी  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० व्या मिशन ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धेला आज दिनांक ४ जानेवारी रोजी मोठया उत्साहात सुरवात झाली. 
कलीका देवी मंदिर येथे आयोजित या राज्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून २१० खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद  दिला. 
या स्पर्धेचे उदघाटन नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कलीका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, संचालक दत्ता  पाटील, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष तथा भारतीय तलवारबाजी महासंघाचे खजिनदार अशोक दुधारे, मधुकर देशमुख, राजू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी खेळाडूंना मार्गर्दर्शन करतांना रवींद्र नसली यांनी संगीतले की मिशन ऑलिम्पिक हा  फार छान  प्रोजेक्ट आहे. या स्पर्धाचा उद्देश लहान वयाच्या खेळाडूंनी स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या खेळात प्रगती करून आप्लयाझ देशाकडून ओलीम्पिकमध्ये सहभाग मिळवावा अशी आहे. त्यामुळे खेळाडूंनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या खेळात जास्तीत जास्त प्रगती करून  भारताकडून ओलीम्पिकमध्ये खेळण्याचे आणि पदक प्राप्त करण्याचे धेय्य ठेवावे असे सांगितले.यावेळी  महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे यांनी आपल्या प्रास्तवीकामध्ये  या मिशन  ऑलिम्पिकचा हेतू  सांगून यासाठी महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि भारतीय तलवारबाजी महासंघाचे गेल्या वर्षीपासून अश्या प्रकारे प्रयत्न सुरु आहेत असे सांगून या माध्यमातून खेळाडूंच्या दर्जामध्ये चांगली प्रगती दिसून येत आहे असे सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक  देशमुख यांनी केले. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News