नाशिक २९ जुलै २०१९ :– स्त्री मंडळ, तिडके कॉलनी व नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कै. उषाताई वैशंपायन मेमोरियल बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष श्री. राधेश्याम मुंदडा व डॉ. शर्मिला कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर विश्वस्थ आशाताई काशीकर, स्मिता वैशंपायन, अलका कुकडे, स्वाती राजेबहाद्दर, डॉ. सुचेता बच्छाव, दिपाली गायधनी हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. मुंदडा यांनी सांगितले नाशिक मधील बॅडमिंटन खेळाचा दर्जा चांगल्या पद्धतीने उंचावतो आहे, त्यासाठी नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि विविध स्पोर्ट्स क्लब मेहनत घेत आहेत. त्यामुळे अनेक नवीन खेळाडू तयार होत आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सौ. स्मिता वैशंपायन यांनी केले. या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून सर्वश्री. पराग एकांडे, चंदन जाधव, अभिषेक पाटील, राजेंद्र लोहार, इरा जोशी, प्रणव सवई, प्रसाद शिवदे यांनी काम पाहिले. या समारंभ प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्युनिअर १९ वर्षाखालील नाशिकचा संघ जाहीर :- यावेळी नागपूर येथे १जुलै पासून आयोजित महाराष्ट्र राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्हाच्या १९ वर्षाखालील ज्युनिअर संघाची घोषणा निवड समितीच्या प्रमुख डॉ. शर्मिला कुलकर्णी यांनी केली. या संघामध्ये शंतनू पवार, अमेय खोंड, शुभम अहिरे, विपुल चाफेकर तर मुलींमध्ये सई नांदूरकर, शिल्पी पुसदकर, ध्रुती पटेल यांची निवड झाली आहे. हा संघ १ जुलै २०१९ पासून सुरु होणाऱ्या सांघिक स्पर्धेत सहभाग घेईल. तसेच नंतर वैयक्तिक स्पर्धेमध्ये सदर खेळाडू सहभाग घेतील. या संघाचे प्रशिक्षक म्हणून चंदन जाधव हे संघाबरोबर असणार आहेत.
स्पर्धेचे निकाल खलीलप्रमाणे.
१) १० वर्षाखालील मुली : विजेती – दर्शिता राजगुरू, उपविजेती – अनुष्का थत्ते
२) १० वर्षाखालील मुले : विजेता – सक्षम पठाणीया, उपविजेता – ओम अमृतकर
३) १३ वर्षाखालील मुली: विजेती – शर्वई हगवणे, उपविजेती – क्रिष्णा काकडे
४) १४ वर्षाखालील मुले : विजेता – पार्थ लोहकरे, उपविजेता – सोहम हिंगणे
५) १५ वर्षाखालील मुली : विजेती – देवांगी जाधव, उपविजेती – वरदा एकांडे
६) १५ वर्षाखालील मुले : विजेता – राजदीप मानकर, उपविजेता – सर्वेश केळकर
७) १७ वर्षाखालील मुली : विजेती – देवांगी जाधव , उपविजेती – रिद्धी कंदोई
८) १७ वर्षाखालील मुले : विजेता – अमेय खोंड , उपविजेता – विपुल चाफेकर
९) १९ वर्षाखालील मुले : विजेता – अमेय खोंड, उपविजेता – विपुल चाफेकर
१०) पुरुष सिंगल : विजेता – मनोज महाजन, उपविजेता – राजेंद्र लोहार
११) मिक्स दुहेरी : विजेते – विक्रांत करंजकर व विशाखा पवार , उपविजेते – पराग एकांडे व अदिती कुटे
१२) पुरुष दुहेरी : विजेते – पराग एकांडे व विक्रांत करंजकर, उपविजेते – मनोज महाजन व आदित्य शिरसाठ





