जिल्हा क्रीडा संकुल खेळाडुंसाठी सुविधापूर्ण असावे : – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Jan 8, 2020

नाशिक: खेळाडुंसाठी सर्व सुविधापूर्ण जिल्हा क्रीडा संकुल तयार करण्यात येवून खेळांच्या सुविधेत कोणतीही तडजोड करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जि.प. बांधकाम सभापती संजय बनकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) वैशाली झनकर, कार्यकारी अभियंता श्री. पांडे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील खेळाडुंना प्रोत्साहीत करून त्यांना क्रीडा क्षेत्रात चांगली कारकीर्द घडविण्यासाठी क्रीडा संकुल हे एक व्यासपीठ असल्याने जिल्हा क्रीडा संकुलाची रचना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे क्रीडा संकुल बनवितांना त्याची देखभाल दुरूस्ती व पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांच्या अनुषंगाने त्यात काही प्रमाणात व्यवसायिक दृष्टिकोन असणे देखील गरजेचे आहे. तसेच त्यात नवीन कल्पानांचा व आधुनिक क्रीडा सामुग्रीचादेखील वापर करण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.जिल्हा क्रीडा संकुलासाठी एकूण आठ कोटी रुपये मंजुर झाले असून त्यापैकी साधारण रूपये चार कोटी अनुदान प्राप्त झाले आहेत. त्यानुसार वास्तूविशारद यांचेकडून सदर जिल्हा क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करून घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी दिली.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या इतर सदस्यांनी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News