‘ हरिहर हॅमर्स ‘ ला विजेतेपद तर ‘ शिवनेरी किंग्ज ‘ उपविजयी

Jul 1, 2019

अजिंक्य वैद्य आणि महिमा गाडीलोहार बेस्ट ज्युदोकाचे मानकरी.
ज्युदो प्रिमियरचे पहिले पाऊल यशस्वी – रत्नाकर पटवर्धन – सचिव- नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन.
नाशिकमध्ये पहिल्या ज्युदो प्रिमीयर लीग स्पर्धेची यशस्वी सांगता

नाशिक :– महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि परवानगीने नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या ज्युदो हॉलमध्ये आयोजित पहिल्या ज्युदो प्रिमीयर लीग स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. .
भारतात प्रथमच आयोजित या पहिल्या ज्युदो प्रिमीयर लीग स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत हरिहर हॅमर्सने सरस कामगिरी करून शिवनेरी किंग्ज चा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. तर चांगली लढत देऊनही केवळ पाच गुणांच्या फरकाने शिवनेरी किंग्जला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. हरिहर हॅमर्सकडून खेळतांना राष्ट्रकुल स्पर्धात पदक प्राप्त केलेल्या हर्षल थिटे, राष्ट्रीय खेळाडू योगेश मोरे, सचिन पाटील, गणेश चोरडे, अंकित सोनावणे यांनी आपल्या बॉऊट्स जिंकून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पडली. तर शिवनेरी किंग्जकडून नाशिकचा राष्ट्रकुल स्पर्धेत रजत पदक मिळविलेला अजिंक्य वैदय, ऋषिराज भोसले, श्रद्धा गिरी आणि विद्या लोहार यांनी चांगली लढत दिल्यामुळे या सामन्यात चांगलाच संघर्ष दिसून आला. परंतु ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाही.
याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात हरिहर हॅमर्सने तुंग टायटन्सचा तर शिवनेरी किंग्जने अंनकाई अटॅकर्स चा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धे अजिंक्यपद आणि उपविजेतेपद पटकावणाऱ्या संघाना आकर्षक चषक, मेडल्स आणि रोख पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारा शिवनेरी किंग्ज चा अजिंक्य वैद्य (नाशिक ) आणि हरिहर हॅमर्सची महिमा गाडीलोहार या खेळाडूंना उत्कृष्ट ज्युदोका म्हणून चषक, मेडल आणि रोख रक्कम देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ ज्युदो मार्गदर्शक आणि या स्पर्धाचे आयोजन प्रमुख डॉ. रत्नाकर पटवर्धन यांनी सांगितले की नाशिकमध्ये आम्ही अश्या प्रिमीयर लीगचा पहिला प्रयोग केला तो बऱ्याच अंशी सक्सेस झाला असे दिसून आले. अश्या स्पर्धांमुळे खेळाडूंच्या गुणवत्तेत नक्कीच प्रगती होईल असे सांगून या पहिल्या प्रिमीयर लीगला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाच्या खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
या स्पर्धाच्या आयोजनासाठी डॉ. रत्नाकर पटवर्धन, रवींद्र मेतकर, विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश धाडवे, माधव भट, योगेश शिंदे , तुषार माळोदे, स्वप्नील शिंदे, सुहास मैद, वैष्णवी कणसे, स्वाती कणसे, ऋषिकेश वाघचौरे,दुर्गा जाधव, नामदेव कचरे, संदीप पाटील आणि बाळकृष्ण धोंडगे आणि नाशिकच्या ज्युडो खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News