‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ मध्‍ये कॅन्सर तपासणी मोफत : डॉ.राज नगरकर

Feb 4, 2020

वल्ड कॅन्सर दिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

नाशिक : आज जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कॅन्सर हा महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला ४० लाख कॅन्सर पीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी पंधरा-सोळा लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे.
य आजारावर मात करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे याविषयी जागरूकता … हि जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ यांनी आज वल्ड कॅन्सर दिवसानिमित्त जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. जर वेळीच कॅन्सरची माहिती मिळाली नाही तर मृत्यूचा धोका अधिक वाढतो. कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता जागतिक कॅन्सर दिवसापासून मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक उपचाराबरोबरच कॅन्सर विषयी शंखांचे निराकरण देखील दुपारच्या वेळी केले जाणार आहेत. महिलांमधे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर सर्वात जास्त होतो. स्तन, गर्भाशय, तोंडाचा आणि फुफ्फुस कॅन्सरही अधिक होतात. या आजाराचं वाढतं प्रमाण लक्षात घेता याबाबत अधिक प्रमाणात जनजागृती पसरवंण गरजेचं आहे. यापूर्वी ओपीडीत २-३ नवीन पेशंट बघावयास मिळायचे मात्र आता ती संख्या ३०-४० वर जाऊन पोहचली आहे. ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ आधुनिक उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करीत असते. २५व्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांनी पुढे येऊन स्वतः कॅन्सरबद्दल जागरूक व्हावं असं मत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. राज नगरकर यांनी व्यक्त केले. तर बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्यापिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे या कारणांमुळे कर्करोग असल्याचे समोर आले आहे. सर्वांत जास्त कर्करोगाचे रुग्ण गुजरातमध्ये आढळले होते. त्यानंतर कर्नाटक व तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्र होता. ‘तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूचे सेवन अधिक केल्याने होतो. मद्यसेवन (दारू) केल्याने हा धोका अधिक वाढतो. बसून असलेले काम, बदलती लाइफस्टाइल आणि वाढणारे वजन यामुळे कॅन्सरला बळ मिळत आहे.
तपासणीसाठी वेळ दररोज 3 ते 5, अपाँईटमेंट संपर्क क्रमांक- 18002665858

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News