नाशिकमध्ये रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी किडस्‌ मॅरेथॉन लहानग्यांच्या प्रोत्साहनासाठी या उपक्रमाचे आयोजन

Feb 7, 2020

नाशिक : शालेय मुलांमध्ये लहानपणा पासूनच धावण्याची त्याचप्रमाणे व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने नामांकित  ला अल्ट्रा 555 किलोमिटर ही अवघड अशी   स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव भारतीय आशिष कासोदेकर यांच्या संकल्पनेतून रविवारी दिनांक १६फेब्रुवारी, २०२० रोजी नाशिकमध्ये लहानग्यांसाठी ” किडस्‌ मॅरेथॉन ”  आयोजित करण्यात आली आहे.    ” सिम्पल स्टेप्स ए रन फॉर हॅपीनेस ” या संस्थेच्या वतीने ” फिट इंडिया.”…अशा आकर्षक मथळ्याखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नाशिकमध्ये या मॅरेथॉनचे हे दुसरे वर्षे आहे. नाशिकच्या एच.पी.टी. कॉलेज रोड – गंगापूर रोडच्या लिंक रोडवर असलेल्या दिव्यदान, डॉन बॉस्को मार्ग हे या मॅरॅथॉनचे मुख्य ठिकाण असेल. रविवारी सकाळी सहा वाजता याच मुख्य ठिकाणाहुन मॅरेथॉनला सुरवात होईल. नाशिक महानगरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे झेंडा दाखवून स्पर्धेला सुरवात करतील. या स्पर्धेमध्ये पहिला गट(२ ते ३वर्षे – १०० मिटर अंतर), दुसरा गट (४ ते सहा वर्षे- दिड किलोमिटर-अंतर), तिसरा गट(७ ते ८ वर्षे- ३ किलोमिटर अंतर), चौथा गट(९ ते ११ वर्षे- ५ किलोमिटर अंतर) आणि पाचवा गट (१२ ते १५ वर्षे- ७ किलोमिटर अंतर) याप्रमाणे स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ मुलांना स्पर्धेसाठी तयार करणे हा या मॅरेथॉनचा उद्देश नसून त्यांच्यात धावण्याची क्षमता निर्माण व्हावी तसेच ती सतत कायमस्वरूपी त्यांनी अंगीकारावी यासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे या स्पर्धेचे  संपूर्ण अंतर पार करून स्पर्धेक परतल्यावर सर्व गटातील स्पर्धकांना मेडल देण्यात येणार आहे. पुण्यात गेल्या पाच वर्षीपासून या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात असून त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या वर्षी आम्ही पहिली मॅरेथॉन घेतली. त्यास चांगला प्रतिसाद लाभला. यंदाही या स्पर्धेला चांगला असा  भरघोस प्रतिसाद नक्कीच मिळेल असे संयोजक श्री. आशिष कासोदेकर यांनी सांगितले.या मॅरेथॉनच्या निमित्ताने सर्व सहभागी खेळाडूंना टी शर्ट, प्रमाणपत्र, पदके, असे संपूर्ण किट त्याचबरोबर स्नॅक्स देण्यात येणार आहे. हे सर्व कीट खेळाडूंना नोंदणीवेळी उपलब्ध असेल. ॲब्स नाशिक हे या स्पर्धेचे फिटनेस पार्टनर आहे. या मॅरेथॉनच्या सहभागासाठी १३ फेब्रुवारी या तारखेपर्यत www.simplestepsmarathon.com  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जयश्री मो. क्र. 9607990099, स्वरूपा मो. क्र. 9881098228, यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News