पहिली क्रीडा क्षेत्रावरील पंथनाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न; शिशु विहार आणि बालक मंदिर बक्षीचाचे मानकरी अश्या उपक्रमांना कायमस्वरुपी सहकार्य केले जाईल – केशव अण्णा पाटील

Feb 10, 2020

नाशिक दिनांक १० फेब्रुवारी :- सवंगडी संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये प्रथमच  क्रीडा / खेळ  या  विषयावर पंथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते चवथी आणि पाचवी ते आठवी अश्या दोन गटाचा समावेश होता.  
   कालिका देवी मंदिर संस्थानच्या  प्रांगणात  आयोजित या कार्यक्रमामध्ये  कलाकारांनी सुंदर पथनाट्याचे सादरीकरीकरण केले. यामध्ये लहान गटात मध्यवर्ती 
 हिंदू सैनिकी  शिक्षण मंडळाच्या  शिशु विहार या शाळॆच्या कलाकारांनी मोबाईलचा दुरुपयोग आणि त्याचे बालकावर आणि एकंदरीतर  समाजावर होणारे दुष्परिणाम  याविषयी अगदी सुंदर नाटय सादर केले. यामध्ये त्यांनी  मोबाईलवर खेळ खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळावे त्याचा कसा चांगला उपयोग होतो  याचे अगदी सुंदर सादरीकरण केले. तर मोठया गटात बालक मंदिर शाळेच्या कलाकारांनी दूरदर्शनचे बालकावर आणि समाजावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम याविषयी पथनाटय  सादर केले. यामध्ये त्यांनी दूरदर्शनवर सादर होणारे आपल्याला उपयोगी असणारे कार्यक्रम नक्कीच बघावे. परंतु आपल्याला उपयोगी  नेसलेले आणि केवळ मनोरंजन आणि टाईम पास 
करण्यासाठी दूरदर्शनला चिटकून आपला मोलाचा वेळ वाया घालवणे हे अयोग्य आहे  याविषयी सादरीकरण केले. 
या कार्यक्रमामध्ये सुंदर सादरीकर करणाऱ्या कलाकारांना प्रमुख पाहुणे कालिका मंदिर देवी ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील आणि क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी यांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र आणि  पुस्तक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर या कलाकारांकडून अत्यंत सुंदर सादरीकरण करून घेणाऱ्या छोट्या गटाच्या  त्याच्या दिग्दर्शक आणि लेखक सौ सपना कासार आणि मोठया गटाच्या सौ प्रिती यावलकर यांचाही यावेळी गौरव  करण्यात आला. यावेळी बोलतांना केशव अण्णा पाटील यांनी सांगितले की, या कलाकारांनी या पथनाट्याद्वारे फार योग्य विषयावर सुंदर असे सादरीकरण केले. यावरून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले.  कारण आम्हीही  अश्या पथनाट्यामध्ये भाग घेऊन सादरीकरण केले होते.  आज सादर केलेल्या नाट्यामध्ये  मोबाइल आणि दूरदर्शन याचा होणार चुकीचा वापर यावर भाष्य केले आहे. हा संदेश सर्व समाजामध्ये जाणे फार गरजेचे झाले आहे. असे सांगून या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सवंगडी संस्थेचे कौतुक केले आणि  अश्या उपक्रमासाठी कालिका मंदिर संस्थांच्या माध्यमातून नेहमीच कायमस्वरूपी सहकार्य केले जाईल असे सांगितले. यावेळी आनंद खरे यांनी सांगितले की क्रीडा क्षेत्रात अश्या एका महत्वाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे ही फार महत्वाची बाब आहे असे सांगितले. या पथनाट्याचे परीक्षक म्हणून सिने श्रुष्टीतील दिग्दर्शक रवी जन्नावार आणि क्रीडा क्षेत्रातील छत्रपती पुरस्कार वितेते तथा  क्रीडा समीक्षक आनंद खरे यांनी काम बघीतले. 
यावेळी  या कार्यक्रमाचे आयोजक नितिन  हिंगमिरे यांनी सांगितले की आमच्या संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच तीच्या उपनद्या यावर स्वच्छतेचे कां केले जात आहे, शिवाय कें ..के.वाघ, निफाड या संस्थांच्या सहकार्यातून बीजरोपणाचे कां केले जात आहे. तसेच विविध शाळेमध्ये  क्रीडा विषयक गोडी निर्माण व्हावी आणि खेळाडूंनी योग्य  खेळ निवडून त्यामध्ये प्रगती करावी असे उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या क्रीडा विषयक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते असे सांगून यापुढे नाशिकच्या जास्तीत जास्त संस्था आणि शाळांनी यामध्ये  सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याकार्यक्रमाच्या  आयोजनासाठी  सवंगडी संस्थेचे अध्यक्ष नितिं हिंगमिरे, सचिव दीपक बैचे,. संगीता हिंगमिरे, शशांक वझे, वेदिका हिंगमिरे, गौरी बैचे , मनोक खैरनार  आदिंनी परिश्रम घेतले. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News