प्राप्तिकर विभागाच्या विभागीय क्रिडा संपन्न…!

Feb 15, 2020

प्राप्तिकर विभाग, नाशिक द्वारा दिनांक. १३ व १४ फेब्रुवारी, २०२० ला केंद्रीय राजस्व क्रीडा व सांस्कृतिक बोर्ड (सीआरएससीबी) च्या उप क्षेत्रीय क्रीडा महोत्सव २०१९-२० चे आयोजन स्व. मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आले. या समारंभाचे उद्घाटन सन्माननीय श्री. सुब्रत मिश्र, मुख्य आयकर आयुक्त, नाशिक यांनी केले. हा कार्यक्रम श्री.सतीश शर्मा – प्रधान आयकर आयुक्त, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
आमंत्रित अतिथी श्री विश्वास नांगरे पाटील (आयपीएस), पोलिस आयुक्त, नाशिक, श्री. अविनाश थेटे (आयआरएस) आयुक्त, वस्तू व सेवा कर, नाशिक, श्रीमती स्मिता डोळस – (आयआरएस) आयुक्त, वस्तू व सेवा कर (अपील), नाशिक, शेखर गजभिये – (आई आर एस),आयकर आयुक्त (अपील), श्री. सूरज डी. मांढरे (आय.ए.एस.) जिल्हाधिकारी,नाशिक , श्रीमती आरती सिंह – (आयपीएस) पोलिस अधीक्षक, ग्रामीण, नाशिक या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नाशिकच्या खेळाडू कविता राऊत, मोनिका आत्रे, संजीवनी जाधव (आंतराष्ट्रीय एथलीट) यांचा आयकर विभागाने गौरव केला.
आयोजित कार्यक्रमा दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आयकर आणि सेवा व वस्तू कर (सीजीएसटी) विभागातील ३५० हुन अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. भारतीय राष्ट्रीय संघ (जलतरण) चे सदस्य असलेले श्री. रोहित हवालदार यांनीही स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि सर्व सहभागींना शपथ दिली.
आयकर विभाग नाशिकचे श्री. संजय पुंगलिया, अतिरिक्त कर आयुक्त श्री. अमित कुमार सिंग आणि अतिरिक्त कर संचालक श्रीमती क्रांती यादव, श्री. बिद्युत.बागची, श्री. जे. ए. कडालूर यासर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आयकर विभाग आणि सेवा व वस्तू कर (सीजीएसटी) चे अधिकारी, कर्मचारी, ज्यांनी नाशिक, पुणे, नागपूर येथून हजेरी लावली होती, श्री.माधव सहस्रबुद्धे, आयकर अधिकारी, नाशिक यांनी आयोजित केलेल्या समारंभात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. आयकर विभाग, नाशिक मधील सर्व अधिकारी / कर्मचार्‍यांच्या प्रचंड योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे संचालन आयकर अधिकारी श्रीमती नीता फडके आणि वरिष्ठ कर सहाय्यक श्री ए.एच. इनामदार यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News