यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने ३१व्या खुल्या आंतर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठया उत्साहात प्रारंभ यशवंत व्यायामशाळेसारख्या क्रीडा संस्थांमुळे क्रीडा क्षेत्राला मोठा लाभ – रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी.

Feb 22, 2020

नाशिक दि. २१ फेब्रुवारी :- यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने आयोजीत  ३१ व्या जिल्हा स्तरीय खुल्या  शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला आज मोठया उत्साहात सुरवात झाली. गेल्या ३० वर्षांपासून या स्पर्धांचे आयोजन केले जात असून या वयोगटाच्या खेळाडूंना स्पर्धाचा अनुभव मिळावा आणि खेळाडूंच्या खेळात प्रगती व्हावी हा या स्परधा  आयोजना मागील हेतू आहे.  या स्पर्धाचे उदघाटन नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, बास्केटबॉल कोच राजेश क्षत्रिय , क्रीडा संचालक डॉ. मीनाक्षी गवळी, क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे आनंद खरे आणि अविनाश खैरनार  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना रवींद्र नाही यांनी सांगितले की यशवंत व्यायाम शाळा या क्रीडा संस्थेला १०३ वर्षाचा इतिहास आहे.  अश्या संस्थांच्या क्रीडा क्षत्रातील योगदानामुळेच खऱ्या अर्थाने मोठा लाभ होत आहे. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या ३२ वर्षांपासून सात्यत्याने लहान वयाच्या मुलां – मुलीसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात जेणेकरून याचा फायदा नाशिक जिल्हातील सर्व शाळांच्या खेळाडूंना होतो आहे. कारण या स्पर्धात नाशिक महानगरातील शाळांपासून  ते घोटी, इगतपुरी, ओझर, कळवण देवळाली सिडको, नाशिकरोड, एकलहरे अश्या  विविध भागातून खेळाडूंना संधी मिळत आह, त्याचप्रमाणे महानगरपालिका क्रमांक ५५ या  शाळांचे संघ सहभागी झाले आहेत ही फार चांगली बाब आहे असे सांगून खेळाडूंना शुभेच्या दिल्या. या स्पर्धेचे औचित्य साधून बास्केटबॉल कोच राजेश क्षत्रिय यांना महाराष्ट्र शासनाचा नाशिक जिल्हा उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक आणि डॉ. मीनाक्षी गवळी यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  त्यांचा यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दीपक पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला.   या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले. ता स्पर्धेत १४ वर्षे मुले आणि मुली आणि १७ वर्षे मुले आणि मुली या चार गटांचा समावेश आहे. यामध्ये १४ वर्षे मुलांमध्ये १९ संघ , १७ वर्षे मुलांमध्ये १६ संघ आणि मुलीमध्ये  दोन्ही गटांचे १७ संघ सहभागी झाले आहेत. या संघादरम्यान प्रथम साखळी सामने खेळविले जाणार असून त्यानंतर बाद पद्धतीने सामने पार पडणार आहेत. उदघाटनानंतर स्पर्धेला सुरवात झाली. यामध्ये  १४ वर्षे मुलांच्या गटात डी. डी. बिटको, बॉईज टाउन, जु. स. रुंगठा शाळा, महानगर शाळा क्रमांक – ५५, टी जे चव्हाण शाळा, रंगुबाई जुन्नरे शाळा  यांनी सुंदर खेळ करून आपले साखळी सामने जिंकून चांगली सुरवात केली. तर १७ वर्षे गटात सेंट फ्रान्सिस स्कुल , राणेनगर, टी. जे. चव्हाण यांच्याबरोबर घोटीच्या जनता विद्यालय आणि इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कुलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून विजयी सुरवात केली. मुलींच्या गटात नाशिकरोडच्या र. ज. चव्हाण संघ, टी जे, चव्हाण, बॉईज टाउन स्कुल,  पुष्पावती रुंगठा शाळा यांनी आपले सामने जिंकून चांगली सुरवात केली. उद्या सकाळी आठ वाजेपासून सर्व गटांचे साखळी सामने होणार असून गटवार साखळीमधून प्रत्येक गटातून पहिल्या दोन संघाना बॅड फेरीत प्रवेश मिळणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली. 

आजच्या सामन्यांचे निकाल :-

 १४ वर्षे मुले :-

१) टी. जे. चव्हाण विजयी विरुद्ध राज इंटरनॅशनल स्कुल ( २५- १७, २५- १६)

२)  रुंगठा स्कुल  विजयी विरुद्ध स्टोबेरी स्कुल ( २५- १२, २५- १४) 

३)  बॉईज टाउन स्कुल   विजयी विरुद्ध ए. पी. पी. स्कुल  ( २५- १८, २५- २२)

४) म. न. पा . शाळा क्र . ५५ विजयी विरुद्ध बिटको स्कुल  ( २५- ११, २५- १५)

५) रंगुबाई जुन्नर स्कुल  विजयी विरुद्ध सेंट थॉमस स्कुल   ( २५- १५, १२- २५,  २५- २२)   

१७ वर्षे मुले :-

१) सेंट फ्रान्सिस विजयी विरुद्ध सेंट थॉमस स्कुल ( २५- १८, २५- १२) 

२) टी. जे. चव्हाण विजयी विरुद्ध रंगुबाई जुन्नरे  स्कुल ( २५- २०, २५- १८)

३) जनता विद्यालय विजयी विरुद्ध सेंट थॉमस स्कुल ( २५- १२, २५- १४) 

४)  महात्मा गांधी स्कुल विजयी विरुद्ध रुंगठा स्कुल  ( २५-२३, २५- २०)

१४ वर्षे मुली  :-

१) बॉईज टाउन स्कुल  विजयी विरुद्ध र; ज. चव्हाण  स्कुल ( २५- १२, २५- १५) 

२) टी. जे. चव्हाण विजयी विरुद्ध रूंगठा स्कुल ( २५- २१, २५- १०)

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News