नाशिक – अशोक ग्रुप ऑफ शाळेतील ‘शुटिंग’ या खेळात सहभागी असणारा विधार्थी देबाजीत दत्ता रॉय, हा यंदा भारतीय संघात स्थान पटकाविणारा नाशिक जिल्हातील अव्वल खेळाडू आहे. अशोका शाळेत शिकत असताना त्याची शुटिंगची आवड लक्षात घेऊन शाळेतील प्रशिक्षक अभय कांबळे यांनी त्याला प्रोत्साहन दिले व २०१५ मध्ये देबाजीतने आपली पहिली स्पर्धा जिल्हापातळीवर ‘एअर रायफल’ या विभागात जिंकत कांस्य पदक पटकाविले. यानंतर २०१६ साली झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. यानंतर कांस्य, रजत पदक मिळवित त्याने पुणे येथे पार पडलेल्या ६० व्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याची निवड झाली.
यानंतरच्या जिल्ह्यापातळीवरच्या व राज्य पातळीवरच्या अनेक स्पर्धातुन देबाजीतने सातत्याने सुवर्ण, रजत पदक मिळवित यश संपादन केले. ६१ व्या राष्ट्रीय पातळीवर शुटिंग’ स्पर्धेत त्याने केरळ येथे झालेल्या सामन्यातही निवडुन येत भारतीय संघात प्रवेश केला. याचसोबत नवी दिल्ली येथे झालेल्या ‘खेलो इंडिया खेलो’ यानंतर कोल्हापूर, दिल्ली, मुंबई, केरळ येथे पार पडलेल्या अनेकविध स्पर्धातुन स्वतःला सिद्ध करीत देबजीत दत्ता रॉयने अनेकदा सुवर्णपदक पटकाविले. अनेक आंतरशालेय स्पर्धातुन चमकत असतांनाच त्याने जानेवारी २०२० मध्ये केरळ येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी होत प्रथमच राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम गुण पटकावित भारतीय संघातील युवश्रेणीत स्थान मिळविले आहे. या संघाचे शिबिर येत्या १ एप्रिल २०२० पासून नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धातूनही त्याची निवड करण्यात आली होती.
देबजीत दत्ता रॉयने शुटिंग या खेळात प्राविण्य मिळवित असतांना अनेक आव्हानांना तोंड देत यश मिळविले आहे. आठव्या खुल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेल्या देबाजीतने एकविस वेळा या चाचणी स्पर्धातून सहभागी होत स्वतःला सिद्ध केले आहे. ही सगळी यशाची कहाणी देबजीत साठी नक्कीच आव्हानात्मक या करिता होती की यंदा २७ फेब्रुवारी २०२० पासुन सुरु होणारया दहावीच्या परिक्षेसाठि सुद्धा त्याची तयारी एकीकडे सुरु होती.
भारतीय पातळीवर झालेल्या २०१९ च्या चाचणी स्पर्धेतुन देबजीतने ६२१.६ इतके गुण मिळवित ६ व्या क्रमांकावर स्थान पटकाविले आणि यंदा तर त्याची निवड भारतीय संघात झाली असुन हे देबजीतच्या निरंतर कष्टाचे, प्रामाणिकपणाचे तसेच चिकाटीचे फळ आहे. त्याच्या ह्या उत्तुंग यशासाठी त्याला प्रशिक्षक अभय कांबळे त्याचे मार्गदर्शन लाभले
‘शुटिंग ‘ या खेळासाठी युवाश्रेणीतुन राष्ट्रीय पातळीवर निवडला जाणारा देबजीत रॉय हा एकमेव अशोका ग्रुप ऑफ स्कूलचा विध्यार्थी आहे. असे अशोका शाळेच्या पदाधिकारांनी आवर्जुन नमूद केले. शुटिंग स्पर्धासाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करणारा देबजीत रॉय हा अशोका ग्रुप ऑफ स्कूलचा आणखी एक मानाचा तुरा होय. त्याच्या ह्या अभिमानस्पद कामगिरीसाठी तसेच पुढील स्पर्धांतील उज्वल यशासाठी अशोका ग्रुप ऑफ लच्या सर्व विश्वस्त पदाधिकारी तसेच कर्मचारी शिक्षक, पालकवर्गाने शुभेच्छा प्रदान करीत त्याचे अभिनंदन केले आहे.
नाशिकमध्ये राज्यस्तरीय जुदो लीग स्पर्धेचे आयोजन
लीग स्पर्धेमधून संघभावना जोपासण्यास मदत - रत्नाकर पटवर्धन, सचिव नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन...






