महिला सबलीकरणासाठी ‘ यु मुंबा कबड्डी ‘ संघाचा पुढाकार

Jul 1, 2019

ऑस्ट्रेलिया च्या वाणिज्य दूतावासाच्या आणि अपनालय स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने नाशिक येथील प्रशिक्षण शिबिरात कबड्डी खेळ हे माध्यम वापरून महिला सबलीकरणासाठी प्रयत्न

नाशिक : यू स्पोर्ट्स या रॉनी स्क्रूवाला आणि सुप्रतिक सेन यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या संस्थेच्या यू मुंबा कबड्डी संघाचे प्रो कबड्डी च्या गेल्या काही मोसमात ऑस्ट्रेलिया च्या वाणिज्यदूतावासाच्या सहकार्याने महिला सबलीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत.
ऑस्ट्रेलिया च्या वाणिज्यदूतावासातर्फे अपनालय या कबड्डी खेळ हे माध्यम वापरून महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करणा-या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने काही उपक्रम राबविले जातात. गरीब कुटुंबातील मुली आणि महिलांना त्यांच्या परिस्थितीवर मात करीत विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी अपनालय साह्य करते.
गेल्या आठवड्यात अपानालय च्या ७ मुलींना यू मुंबा कबड्डी संघाच्या नाशिक येथील प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहून कबड्डी चे प्रशिक्षण आणि खेळात सहभाग घेण्याची संधी मिळाली. या मुलींना प्रशिक्षक संजीव कुमार बळियां यांनी तीन दिवस खास प्रशिक्षण दिले. यामुळे या मुलींना त्यांच्या ‘फेवरिट ‘ कबड्डी संघाच्या खेळाडूंबरोबर राहण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षण सत्रानंतर ऑस्ट्रेलियातील चार क्रीडा प्रशिक्षकांनी शिबिराला भेट दिली आणि खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्याबरोबर जुलै मध्ये सुरु होणा-या प्रो कबड्डी मोसमाबाबत चर्चा केली.
या उपक्रमाबद्दल यू स्पोर्ट्स चे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुप्रतिक सेन म्हणाले, “खेळांना उत्तेजन देण्याची सुरुवात अगदी तळागाळापासून आणि विशेषतः तरुण पिढी आणि महिला यांच्यापासून झाली पाहिजे अशी आमची धारणा आहे. समाजऋण फेडण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्यदूतवास आणि त्यांची सहकारी अपनालय संस्था यांच्याबरोबर काम करणे ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. संस्थेतील मुली अतिशय गुणी आहेत आणि त्यांच्यात मोठी क्षमता आहे. त्यांच्या प्रगतीत आमचा थोडासा वाटा आहे याचा आम्हाला आनंद आहे. तळागाळातील गुणी मुलांसाठीचा हा उपक्रम आम्ही यापुढेही चालू ठेवणार आहोत. मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्यदूतावासाचे उप-वाणिज्यदूत श्री जेम्स मिड्लटन म्हणाले, ” अपनालय च्या मुलींचा प्रशिक्षण शिबिरातील उत्साही सहभाग आणि यू मुंबा च्या खेळाडूंनी त्यांना आपले अतिथी म्हणून स्वागत करण्याचा दाखवलेला मोठेपणा प्रेरणादायी आहे. गरिबी निर्मूलन आणि टिकाऊ विकास यासाठी स्थानिक पातळीवर होणा-या उपक्रमांना आम्ही थेट अर्थसाह्य करतो. यू मुंबा चे शिबीर ही अपनालय च्या मुलींना खेळाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास देण्याची उत्तम संधी होती. या मुलींना शिबिरातला अनुभव लाभदायक वाटला असेल अशी आशा करतो आणि त्या भविष्यात कबड्डी तील सुपरस्टार म्हणून जगात ख्याती मिळवतील अशी अपेक्षा करतो.”
अपनालय चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . अरुण कुमार म्हणाले, ” मुलांना खेळाचे मैदान उपलब्ध नसणे हे त्यांचे बालपण हिरावले जाण्याचे द्योतक आहे. विशेषतः मुलींना यामुळे सार्वजनिक आयुष्यातून बाहेर फेकले जाते. अपनालय कबड्डीच्या माध्यमातून या मुलींना मुंबईच्या धावपळीतून बाहेर काढून खुल्या आकाशाखाली आणते आणि त्यांच्यासाठी असलेल्या अमर्याद संधी आणि शक्यतांची त्यांना जाणीव करून देते. या आमच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास आणि यू मुंबा कडून मिळालेल्या सहकार्य आणि उत्तेजनाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. “

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News