टेनिस व्हॉलीबॉलच्या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राला मोठा प्रतिसाद करोनाच्या परिस्थीतीतही अश्या चर्चासत्रामुळं क्रीडा संघटक, खेळाडू, कार्यकर्ते यांचा उत्साह कायम राहतो – अशोक दुधारे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक ) या खेळाच्या पुढील वाटचालीस सर्व सहकार्य मिळेल – विजय संतान (विभागीय क्रीडा उपसंचालक)

May 23, 2020

गेल्या दोन महिन्यापासून भारतावर आणि जगावर करोनाचे संकट आहे.  या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व नागरीक  घरातच आहेत. या परिस्थितीत खेळाडूला घरात बसणे अवघड बाब आहे. त्यामुळेच आपल्या घरी बसूनच नियमांचे पालन करून  क्रीडा संघटक, खेळाडूं आणि क्रीडा प्रेमींमध्ये खेळाप्रती असलेली ऊर्जा जागरूक ठेवण्यासाठी  टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड यांनी  ” टेनिस व्हॉलीबॉल परिवार – गप्पा गोष्टी आणि बरंच काही ” या  ऑनलाईन  उपक्रमाचे आणि चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यांना या उपक्रमासाठी त्यांना त्यांचे सहकारी रणजीत चामले, आनंद खरे, गणेश माळवे,  प्रफुल बनसोड, आबा शिरसाठ, मनोज म्हस्के , दशरथ देशींगे, प्रमोद महाजन, डॉ रितेश वांगवाड, आणि इतर अनेक सहकारी सहकार्य करत आहेत.  
. दिनांक २२ ते २६ मे दरम्यान दररोज सकाळी १० ते १२ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केले जात आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उपक्रमाच्या आज दिनांक २३ मे  रोजीच्या  आजच्या सत्राचे उदघाटन  भारतीय तलवारबाजी महासंघाचे  खजिनदार आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे आणि क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक विजय संतान यांनी केले आणि या उपक्रमाला शुभेछया दिल्या आणि मोलाचे मार्गदर्शनही केले.  आजच्या सत्रात ” स्पर्धाचे आयोजन आणि नियोजन ”  या विषयवार औरंगाबादचे क्रीडा संघटक आणि पदाधिकारी  आबासाहेब शिरसाठ आणि प्रमोद महाजन यांनी स्पर्धाचे  चांगल्या  प्रकारे आयोजन होण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे आणि त्याची पूर्तता कश्या प्रकारे करता येईल याबद्दल सखोल माहिती दिली . यामध्ये त्यांनी खेळाचे मैदान, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था,  वाहतूक  यंत्रणा,  तांत्रिक यंत्रणा  , जाहिरात यंत्रणा,  प्रत्यक्ष खेळतांना आवश्यक असलेले साहित्य आणि इतर बाबी अश्या विविध बाबी  पार पाडाव्या लागतात.  या सर्व   कामाचे  चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास स्पर्धाचे आयोजन चांगल्या प्रकारे होण्यास अडचण येत नाही असे सांगितले. विशेष म्हणजे स्पर्धा आयोजनासाठी आर्थिक बाजू  सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी स्पर्धाच्या आयोजकांना  विविध मार्गाद्वारे आपली आर्थिक बाजू मजबूत करता येते असे सांगितले.यासाठी आयोजकांनी  आपल्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी वापरून त्यांना या  विविध कामाचे वाटप करावे असे सांगितले.   
  . आजच्या या ऑन लाईन  सत्राला औरंगाबादच्या साईचे सेंटरचे  संचालक वीरेंद्र भाडारकर, डॉ. सागर बालवडकर, संदीप जगताप यांच्याबरोबर महाराष्ट्रातील आणि विविध राज्यांचे खेळाडू , \संघटक आणि मान्यवरांनी आपली उपस्थिती देऊन चांगला प्रतिसाद दिला. आणि आपल्याकडे असलेली माहिती या प्रसंगी प्रस्तुत केली  त्यासाठी या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी सर्वांना धन्यवाद दिले.      
या ऑन  लाईन सत्राची संपूर्ण तांत्रिक बाजू प्रा. रणजीत चामले सांभाळत आहेत. 
 उद्या दिनांक २४ ने रोजी  ” टेनिस व्हॉलीबॉल या खेळाचे कौशल्य ( स्किल्स) ” आणि ” टेनिस व्हॉलीबॉलची आतंरराष्ट्रीय वाटचाल”   या विषयी  डॉ. दशरथ देशींगे आणि डॉ, रितेश वांगवाड  माहिती सादर करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे उपस्थित राहणार आहेत.  
तरी महाराष्ट्रातील आणि विविध राज्यातील जास्तीत जास्त  क्रीडाप्रेमींनी उद्याच्या चर्चासत्रासाठी  ऑन लाईन आपली  उपस्थिती द्यावी असे आव्हानं टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी केले आहे. 
 

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News