या करोनाच्या संकटसमयी सर्वांना ऊर्जा देण्याचा टेनिस व्हॉलीबॉलचा चांगला प्रयत्न – विरेंद्र भांडारकर(सहसंचालक, पश्चिम विभाग,भारतीय खेळ प्राधिकरण – S A I ) टेनिस व्हॉलीबॉलच्या कार्यशाळेला भारतातून आणि परदेशातूनही संघटक, खेळाडूंचा मोठा प्रतिसाद.

Jun 7, 2020

दिनांक ०७ जून :- गेल्या दोन – तीन महिन्यापासून भारतावर आणि जगावर करोनाचे संकट आहे.  या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व नागरीक  घरातच आहेत. या परिस्थितीतही  नियमांचे पालन करून खेळाडू,  क्रीडा संघटक आणि क्रीडा प्रेमीं आणि सामान्य नागरिक यांची  ऊर्जा जागरूक ठेवण्यासाठी आणि करोनाचा  सक्षमपणे सामना करण्यासाठी   टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड यांनी  ” योगा आणि टेनिस व्हॉलीबॉलच्या माध्यमातून करोनाला पराभूत करा ” या उद्देशाने ऑनलाईन  चर्चासत्राचे आयोजन केले आहे. 
. दिनांक ०७ ते ११ जून, २०२० दरम्यान दररोज सकाळी १० ते १२ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उपक्रमाला आज आज दिनांक  ०७  जून रोजी सुरवात झाली. 
   आजच्या सत्राची सुरवात भारताचे क्रीडा मंत्री यांनी पाठविलेल्या शुभेछ्या पत्राचे वाचन करण्यात आले, तसेच केंद्रीय मंत्री मा. अर्जुन मेघवाल यांनी दिलेल्या  शुभेछ्याचा व्हीडीओ सादर करण्यात आला. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे पश्चिम विभाचे सहसंचालक  डॉ. वीरेंद्र भांडारकर आणि राजस्थानचे अध्यक्ष श्री. रविशेखर मेघवाल  यांनी आपल्या  शुभेछ्या  देऊन या करोनाच्या संकटात भारतातील आणि परदेशातील टेनिस व्हॉलीबॉलच्या परिवाराला ऊर्जा देण्याचे काम  करणाऱ्या  टेनिस व्हॉलीबॉलच्या या उपक्रमाचे कौतुक केले.  आजच्या या ऑन लाईन  सत्राला टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ वेंकटेश वांगवाड यांनी या उपक्रमाचा हेतू सांगितला  आणि यासाठी थेट भारताचे क्रीडा मंत्री मा. श्री किरण रीजुजी, केंद्रीय मंत्री मा. अर्जुन मेघवाल , साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, रविशेखर मेघवाल, आणि  क्रीडा क्षेत्रातील दिग्गज,  शासनाचे अधिकारी या सर्वाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. 
 आजच्या सत्रात   करोनाचा सामना करण्यासाठी योगाचे महत्व ” या विषयवर आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त योगाचे गुरु डॉ.मन्मत घरोटे यांनी याविषयी सखोल माहिती दिली.  योग म्हणजे  शरीर आणि मन याचा समन्वय साधला गेला पाहिजे असे सांगितले.  खेळाडूसाठी आणि सर्व सामान्य नागरिकांसाठीही  शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते.  परंतु त्याचबरोबर त्यांची मानसिक अवस्थाही महत्वाची असते असे सांगितले. खेळाडूच्या हालचालीसाठी शारीरिक हालचालीबरोबर  त्याच्या मनाची अवस्था चांगली असली पाहिजे. म्हणजे ते आनंदी असावे दुःखी नसावे. उत्साही असावे हताश नसावे, आश्वासक असावे तर अस्थिर नसावे. प्रेरणादायी असावे कमजोर नसावे असे  विवीध दाखले  त्यांनी आपल्या व्हीडीओ द्वारे सादर  केले. त्याचप्रमाणे जो खेळाडू सुधृड आहे, त्याचे मानसिक स्थेर्य चांगले आहे, भावनिक संतुलन व्यवस्तीत आहे, सामाजिक परिपक्वता आहे आणि त्यांचे मन अध्यात्मिक उन्नती प्राप्त आहे तोच  खरा खेळाडू आहे असे आपण समजू शकतो असे सांगितले.आणि योगाच्या माध्यमातून आपण या करोनावर निश्चित मत करू शकतो असे सांगितले.  
या ऑन लाईन सत्राची संपूर्ण तांत्रिक बाजू प्रा. रणजीत चामले सांभाळत आहेत. 
या उपक्रमासाठी डॉ. वेंकटेश वांगवाड, रणजीत चामले, आनंद खरे, धर्मेंद्र जडेजा, एस. सांबाशिव राव, डॉ रितेश वांगवाड,  नागेश्वर राव, दिलीप सिंग, राकेश कुमार, अमान शर्मा, माखन सिंग,  मुकेश बाथम, रमेश वर्मा, गणेश माळवे,  प्रफुल बनसोड, आबा शिरसाठ, दशरथ देशींगे,
 मनोज म्हस्के , प्रमोद महाजन आणि इतर अनेक सहकारी परिश्रम घेत आहेत.  
 उद्या दिनांक ०८ जून रोजी  ” टेनिस व्हॉलीबॉल खेळाची माहिती, नियम, पंचाचे कार्ये ” याविषयी पंच कमिटीचे प्रमुख प्रफुल बनसोड,  टेनिस व्हॉलीबॉलचे पश्चिम विभागीय सचिव. तथा संघटक धर्मेंद्रसिंग जडेजा, राष्ट्रीय प्रशिक्षक मनोज माहिती देणार आहेत.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र ओलीम्पिक असोसिएशनचे सहसचिव डॉ. प्रकाश तुळपुळे, महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागाचे . उपसंचालक आनंद व्यंकेश्वर आणि मा. क्रीडा उपसंचालक  जगन्नाथ अधाने, उपस्थित राहणार आहेत.  तरी महाराष्ट्रातील आणि विविध राज्यातील जास्तीत जास्त  क्रीडाप्रेमींनी उद्याच्या चर्चासत्रासाठी  ऑन लाईन आपली  उपस्थिती द्यावी असे आव्हानं टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी केले आहे. या उपक्रमासाठी डॉ. वेंकटेश वांगवाड यांना रणजीत चामले, आनंद खरे, धर्मेंद्र जडेजा, एस. सांबाशिव राव, डॉ रितेश वांगवाड,  नागेश्वर राव, दिलीप सिंग, राकेश कुमार, अमान शर्मा, माखन सिंग,  मुकेश बाथम, रमेश वर्मा, गणेश माळवे,  प्रफुल बनसोड, आबा शिरसाठ, मनोज म्हस्के , दशरथ देशींगे, प्रमोद महाजन, डॉ रितेश वांगवाड, आणि इतर अनेक सहकारी सहकार्य करत आहेत.    

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News