नाशिक दिनांक १४ जुन :- १५ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या वतीने
ऑन लाईन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मल्लखांब आणि नाशिक यांचे वेगळे नाते आहे. कारण मल्लखांबाची मुहूर्तमेढ नाशिकच्या कोठुरे गावात बाळंभट देवधर यांनी रोवली आहे
दुसऱ्या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर. (जन्म : इ.स. १७८०; मृत्यू : इ.स. १८५२) यांचे नाव. घेतले जाते.मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या या चरित्र पुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. त्यांच्या संदर्भात ‘एक होता बाळंभट’ हे पुस्तक लिहिले आहे.
यशवंत व्यायामशाळेत जोपासना – १०४ वर्षांमध्ये वाटचाल करणाऱ्या यशवंत व्यायाम शाळेचे आणि मल्लखांबाचे नातेही संस्थेच्या स्थापनेपासून जोडलेले आहे.
त्यामुळेच १५ जून या आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या निमित्ताने लॉकडाउन असूनही यशवंत व्यायाम शाळांच्या मल्लखांब विभागाच्या वतीने हा महत्वाचा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
उद्या दिनांक १५ जून रोजी मल्लखांब चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा सर्व खेळाडूं घरीच मल्लखांब करून फोटो सादर करणार आहेत , त्याचप्रमाणे मल्लखांबाचे चित्र काढणे, मल्लखांब विषयावर निबंध स्पर्धा अश्या प्रकारे या दिवस साजरा करण्यात येणार आहे. आणि या विविध प्रकारच्या स्पर्धांचे गुणांकन दिले जाणार असून खेळाडूंना नंतर पारितोषिके आणि प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दिपक पाटील हे मल्लखांबाचे राष्ट्रीय आणि विद्यापीठीय स्पर्धामध्ये सुवर्णपदक विजेते आहेत, त्याचप्रमाणे गेल्या पाच पिढ्यापासून आबासाहेब घाडगे मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहेत. तर यशवंत जाधव गेल्या २६ वर्षांपासून मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्याबरोबर यशवंत व्यायामशाळेचे अनेक मान्यवर मल्लखांब खेळामध्ये कार्यरत आहेत. या सर्वांच्या सहकार्याने उद्या हा चवथा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात येणार आहे.






